हायलाइट्स:
- विकी आणि कतरिनाची लोकप्रियता पाहता त्यांना विमानतळावर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणे साहजिक होते
- एरवी सेलिब्रिटींसाठी विमानतळावर सामान्य माणसांना अडवले जाण्याचा प्रकार नवा नाही
- त्यादिवशी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) विकी कौशलपेक्षाही एक मोठी व्यक्ती उपस्थित होती
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस या किल्ल्यात ९ डिसेंबरला विकी आणि कतरिनाचा विवाहसोहळा पार पडला होता. या सोहळ्यासाठी विकी आणि कतरिना ६ डिसेंबरला मुंबई विमानतळावरुन जयपूरला रवाना झाले होते. यावेळी छायाचित्रकारांनी विकी-कतरिनाची छबी टिपण्यासाठी एकच गर्दी केली होती. काहीवेळाने विकी कौशल विमानतळाच्या प्रवेशद्वाराने आत जात होता. विकी आणि कतरिनाची लोकप्रियता पाहता त्यांना विमानतळावर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणे साहजिक होते. एरवी सेलिब्रिटींसाठी विमानतळावर सामान्य माणसांना अडवले जाण्याचा प्रकार नवा नाही. परंतु, त्यादिवशी मुंबई विमानतळावर (मुंबई विमानतळ) विकी कौशलपेक्षाही एक मोठी व्यक्ती उपस्थित होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून उपमुख्यमंत्री अजित पवार होते.
विकी कौशल आणि कतरिना जयपूरला जात असताना अजितदादा (अजित पवार |) मुंबई विमानतळावरुन बाहेर पडत होते. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून ते फोनवर बोलत होते, त्यानंतर अजितदादा बाहेर पडण्यासाठी पुढे निघाले. या सगळ्याकडे छायाचित्रकारांकडे पाहून हात हलवत असलेल्या विकी कौशलचे कदाचित लक्ष नव्हते. फोटोसेशन आटोपल्यानंतर विकी कौशल आतमध्ये जायला आणि अजितदादा बाहेर पडायला एकच गाठ पडली. तेव्हा अजितदादांच्या सुरक्षा ताफ्यातील एका जवानाने विकी कौशलला अडवून बाजूला थांबायला लावले. त्यानंतर अजित पवार मार्गस्थ झाले. त्यामुळे काहीवेळासाठी का होईना, अजित पवार यांच्यासमोर विकी कौशलचे ‘स्टारडम’ काही काळासाठी फिके पडले. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हीडिओत अजितदादांची ऐट आणि रुबाब साफ दिसून येत आहे. त्यामुळेच सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.