हायलाइट्स:
- ‘सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेड’द्वारे लशीची निर्मिती
- चायनिज ‘करोनाव्हॅक’ ओमिक्रॉनसमोर फोल
- एकूण ५० जणांवर संशोधकांचा अभ्यास
जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी चीन निर्मित करोना लस ‘ओमिक्रॉन’समोर मात्र फोल ठरत असल्याचं समोर आलंय. यामुळे चीनला मोठा धक्का बसलाय.
चीनी ग्लूटेन उत्पादकसिनोहॉक बायोटेक लिमिटेड‘द्वारे तयार करण्यात आलेली करोना लस करोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटविरुद्ध शरीरात पुरेशा अँटीबॉडीज निर्माण करण्यात सपशेल अयशस्वी ठरतेय. हाँगकाँगच्या संशोधकांनी आपल्या लॅबच्या सुरुवातीच्या निष्कर्षाच्या आधारावर हा दावा केला आहे.
‘ब्लूमबर्ग’नं दिलेल्या वृत्तानुसार, कोविड १९ पासून बचावासाठी चीनी करोना लसीवर अवलंबून राहिलेल्या किंवा ही लस घेणाऱ्या लाखो लोकांनाही या बातमीमुळे मोठा धक्का बसू शकतो.
सिनोव्हॅकची ‘करोनोव्हॅक‘(कोरोनाव्हॅक) लससहीत आपलं लसीकरण पूर्ण केलेल्या २५ जणांवर हा अभ्यास करण्यात आला. यातील एकाही व्यक्तीच्या शरीरात ‘ओमिक्रॉन’ला पछाडण्यासाठी पुरेशा अँटीबॉडीज आढळलेल्या नाहीत, असं संशोधकांनी म्हटलंय.
याच पद्धतीनं, पी फायझर इंक आणि बायोटेक एसई कडून विकसित करण्यात आलेल्या ‘मेसेंजर आरएनए’ लस घेणाऱ्या २५ इतर जणांवरही अभ्यास करण्यात आला. यातील पाच व्यक्तींमध्ये ओमिक्रॉनवर मात करण्याची क्षमता आढळून आली. कंपनीकडूनही, करोना लशीचा तिसरा डोस अर्थात बुस्टर डोस ओमिक्रॉनविरुद्ध लढण्यासाठी मदत करेल, असं काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं.
हाँगकाँग विद्यापीठातील अत्यंत प्रतिष्ठित संसर्गजन्य रोग विशेषज्ञ प्रोफेसर वोक युंग यूएन यांच्या नेतृत्वाखाली एकूण ५० जणांवर हा अभ्यास करण्यात आला. Medical Journal Clinical Infectious Diseases मध्ये या अभ्यासाचा निष्कर्ष प्रकाशित करण्यात येणार आहे. तसंच हा अभ्यास ऑनलाइनही उपलब्ध आहे.
उल्लेखनीय म्हणजे, जगभरात आतापर्यंत सिनोव्हॅक निर्मित ‘करोनोव्हॅक’ करोना लसीच्या २.३ अब्ज डोसचा वापर करण्यात आला आहे.