हायलाइट्स:

  • अभिनेता राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नाला एक महिना झाला पूर्ण
  • राजकुमारने पत्रलेखासाठी लिहिली रोमँटिक पोस्ट
  • सोशल मीडियावर दोघांवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : अभिनेता राजकुमार राव आणि पत्रव्यवहार यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. लग्नाच्या एका महिन्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजकुमारने बुधवारी त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने पत्रलेखाला उद्देशून एक पत्रही लिहिले आहे… राजकुमारचे हे पत्र आणि त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.

काय म्हणतो राजकुमार…

राजकुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या लग्नातील एक फोटो आणि त्यासोबत पत्रलेखासोबत चिखलात लोळत मस्ती करतानाचा फोटो असे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने लिहिले आहे की, ‘माझी छान मैत्रिण तूच आहेस… माझे प्रेम ही तूच आहेस… माझे हृदय देखील तू चोरले आहेस… माझी खरी दिलदार तू आहे…’ असे लिहित त्याने पत्रलेखाला देखील टॅग केले आहे. याबरोबर त्याने लिहिले आहे की, एक महिना झाला आहे…

राजकुमारने हा फोटो शेअर केल्यानंतर सुमारे साडेचार लाखांहून अधिक चाहत्यांनी तो लाईक केला आहे. या फोटोवर त्याचे चाहते, सोशल मीडियावरील युझर्स भरभरून कॉमेन्टही करत आहेत. अनेक कलाकार मंडळींनी देखील राजकुमारच्या या पोस्टवर कॉमेन्ट केल्या आहेत. त्यामध्ये आयुष्मान खुराना, सिकंदर खेर, हुमा कुरैशी, अनिता श्रॉफ अदजानिया यांचा समावेश आहे.

‘माझं घर करोनाचं हॉटस्पॉट नाही’, ‘कोरोना पार्टी’वर करण जोहरनं दिलं स्पष्टीकरण!


राजकुमारने शेअर केलेला हा फोटो खूप सुंदर असून त्यातून त्यांचे बाँडिंग दिसत आहे. एका युझरने लिहिले आहे की, ‘सध्या लग्नसराईचा मौसम सुरू आहे. जर आज सुशांत सिंह राजपूत असता तर त्याचेही…’ असे म्हणत त्याने दुःखाचा एक इमोजी शेअर केला आहे.

दरम्यान, राजकुमार आणि पत्रलेखा यांनी १५ नोव्हेंबर २०२१ मध्ये चंढीगड येथे लग्न केले. २०१० पासून हे दोघेजण एकमेकांना डेट करत होतो. राजकुमारने पत्रलेखाला पहिल्यांदा एका जाहिरातीमध्ये पाहिले होते. तर पत्रलेखाने राजकुमारला ‘लव सेक्स और धोखा’ या सिनेमात पाहिले होते. त्यानंतर राजकुमारबद्दल तिचे फारसे बरे मत झाले नव्हते. परंतु या दोघांनी एकत्र येणे हे विधीलिखीत होते . त्यामुळे २०१४ मध्ये या दोघांनी ‘सिटी लाइट्स’मध्ये एकत्र काम केले. या सिनेमापासून त्यांच्यात छान मैत्री झाली. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलत गेले. ११ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून अधिकृतपणे स्वीकारले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here