पुत्रप्राप्तीसाठी वैद्याकडे न गेल्यामुळे विवाहितेचा छळ केल्याची धक्कादायक हिंगोलीच्या औंढा तालुक्यात घडलीय. मुलगा व्हावा म्हणून वैद्याकडे येण्याचा आग्रह करणे एका कुटुंबाला चांगलेच अंगलट आले आहे. औंढा तालुक्यातील नांदगाव येथील विवाहितेचा सासरची मंडळी छळ करीत होती. तुला मुलगा कसा होत नाही, या कारणावरून करण्यात येत होता. वंशाला दिवा हवा त्यासाठी वैद्याकडे औषध घेण्यासाठी चल यासाठी विवाहितेकडे तगादा लावला जात होता. मात्र ती वैद्याकडे येत नसल्याने सासरच्या मंडळींनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या कंबरेला व पायाला गंभीर दुखापत झाली.
वाचाः
सासरकडून होणारा छळ सहन होत नसल्यामुळे औंढा नागनाथ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी विठ्ठल कानोजी पांढरे, सुरेश विठ्ठल पांढरे, कानबाराव विठ्ठल पांढरे, यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वाचाः