हायलाइट्स:

  • अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे १४ डिसेंबरला झाले लग्न
  • लग्नाचे गिफ्ट म्हणून विकीने अंकिताला दिली ही महागडी भेटवस्तू
  • लग्नाला आलेल्या पाहुण्यांनीही अंकिताला दिल्या अनेक मौल्यवान भेटी

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा बॉयफ्रेंड आणि उद्योगपती विकी जैन यांचे १४ डिसेंबर रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न झाले. या दोघांचा लग्नसोहळा अतिशय आलिशान पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. लग्नानंतर झालेल्या रिसेप्शनला य़ा दोघांचे जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. या दोघांच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर युझर्स भरभरून कॉमेन्ट करत आहेत. लग्नाचे गिफ्ट म्हणून अंकिताला विकीने एक महागडे गिफ्ट दिले आहे… सध्या त्याही सोशल मीडियावर चर्चा आहे.
पवित्र रिश्ता! अंकिता लोखंडे आणि विकी जैन अडकले विवाहबंधनात

विकीने अंकिताला काय गिफ्ट दिले
मिस्टर जैन यांनी आपल्या बायकोला लग्नाचे गिफ्ट म्हणून मालदीवमध्ये एक आलिशान विला खरेदी करून दिला आहे. याची किंमत ५० कोटींहून अधिक आहे. तर अंकिताने देखील विकीला एक खासगी यॉट गिफ्ट दिले आहे. याची किंमत सुमारे आठ कोटी इतकी आहे.
Video: काय झालं असं की,लग्नमंडपात विकीला पाहून रडली अंकिता…

अंकिता आणि विकीच्या लग्नाला आलेल्या पाहुणे मंडळींनीही या नवदांपत्याला एकाहून एक सरस अशा भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये एकता कपूरने अंकिताला ५० लाख रुपयांचा हि-यांचा सेट दिला आहे. माही विजने सब्यासाची याच्या कलेक्शनमधील १५ लाखांची साडी भेट म्हणून दिली आहे. तर विकी जैनला ऋत्विक धनजानी याने एका महागडे घड्याळ आणि अंकिताला १५ लाख रुपयांचा हि-यांचा चोकर दिला आहे. टायगर श्रॉफने देखील अंकिताला मिनी कूपर ब्रँडची गाडी गिफ्ट म्हणून दिली आहे. तर अभिनेत्री सृष्टि रोडे हिने अंकिताला सोन्याची चेन दिली आहे. अंकिता आणि विकीचे लग्नसोहळा आलिशान पद्धतीने झाला. हे दोघेजण एकमेकांना २०१८ पासून डेट करत आहेत. विकी हा प्रसिद्ध उद्योगपती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here