हायलाइट्स:

  • ‘महाराष्ट्रात ओबीसी मुख्यमंत्री नाही हे दुर्दैव’
  • महादेव जानकरांची खंत
  • सत्ताधाऱ्यांवर केली जोरदार टीका

अहमदनगर : ‘दक्षिणेकडील अनेक राज्यांत ओबीसी समाजाचे मुख्यमंत्री अनेक वर्षांपासून आहेत. महाराष्ट्रात ओबीसींची संख्या जास्त असूनही येथे ओबीसी मुख्यमंत्री नाही. उलट ज्या समाजाची लोकसंख्या तुलनेत कमी आहे, त्यांनाही मुख्यमंत्रिपद मिळाले, हे राज्याचं आणि ओबीसींचं दुर्दैव आहे,’ अशी खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जाणणे यांनी व्यक्त केली. (महादेव जानकर अहमदनगर)

कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांची कर्जत शहरात सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

‘हे लोकशाहीत चालतं का?’; राज्यपालांच्या ‘त्या’ भूमिकेवर अजित पवार यांचा खरमरीत सवाल

पंतप्रधान मोदींचं नाव घेत काय आरोप केला?

‘ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होण्यास केंद्र आणि राज्य सरकारही जबाबदार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं आहे. केवळ मतपेटीचं राजकारण राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार व केंद्रातील भाजपचं सरकार करत आहे. एकाने मारल्यासारखे आणि दुसऱ्याने रडल्यासारखं करायचं असं हे पक्ष ओबीसींच्या बाबतीत करत आहेत. त्यामुळे आमचा ओबीसी समाज अडचणीत आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः ओबीसी आहेत. मात्र, त्यांच्या पाठीमागे असलेल्या शक्ती त्यांना ओबीसींसाठी काम करू देत नाहीत,’ असा आरोपही जानकर यांनी केला.

‘मातोश्री’चा आदेश घेऊन परब कोकणात; रामदास कदम समर्थकांचे पंख छाटले

जानकर पुढे म्हणाले, ‘रासप पक्षाची स्थापना नगर जिल्ह्यामध्ये झाली आहे. कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. तर दुसरीकडे पूर्वी या मतदारसंघात मंत्रिपद मिळूनही आज जनता त्यांच्या पाठीमागे राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा महत्त्वाचा घटक आहे.’

‘दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये ओबीसी समाजाचे मुख्यमंत्री अनेक वर्षांपासून आहेत. आपल्या राज्यात सर्वांत मोठी लोकसंख्या ओबीसींची आहे. तरी देखील आपल्या राज्यात ओबीसींचा मुख्यमंत्री होत नाही. ज्यांची सर्वांत कमी लोकसंख्या आहे, ते या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसतात. हे या ओबीसींचं आणि राज्याचं दुर्दैव आहे. यामुळे आता ओबीसी समाजामध्ये जनजागृती करून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांच्या विरोधात भक्कम आघाडी निर्माण करणार आहोत,’ असंही जानकर म्हणाले. यावेळी आशा क्षीरसागर, रवींद्र कोठारी, अमोल क्षीरसागर यांचीही भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here