हायलाइट्स:

  • अजित पवार शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
  • एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पहिला दौरा
  • नेमक्या काय राजकीय घडामोडी घडणार?

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच जळगावात दाखल होणाऱ्या अजित पवार यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. (अजित पवार ताज्या बातम्या)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाविकास आघाडीने विजय मिळवल्यानंतर चेअरमनपदाची सूत्र राष्ट्रवादीकडे आली. या पार्श्वभूमीवर बँकेच्या आर्थिक विषय, पीककर्ज, पिकविमा यासंदर्भात जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अजित पवार यांची सकाळी ९ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Goa Assembly Election: प्रियांका गांधी यांची गोव्यात मोठी खेळी; ‘हे’ पाऊल उचलत भाजपसह सर्वच पक्षांना केलं चकीत!

कसा असेल अजित पवार यांचा दौरा?

अजित पवार यांचे सकाळी ८.१५ वाजता अजिंठा विश्रामगृह येथे आगमन होणार आहे. ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा, कोव्हिडबाबत बैठक, ११ वाजता जिल्हा दूध संघ येथे प्रक्रिया प्लांटचे उद्घाटन, दुपारी १२.३० ते १.१० राखीव, १.४५ वाजता भुसावळ येथे आगमन नगरपरिषद आयोजित विविध कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा व सभा, २.५५ वाजता डी.एस. ग्राऊंड येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा व पक्षप्रवेश सोहळा होणार आहे, तर सायंकाळी ५ वाजता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here