बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला केसरी कुस्ती स्पर्धेत औरंगाबादची अवघ्या सतरा वर्ष वयाच्या श्रुती बमनावत हिने प्रथम क्रमांक पटकावून या स्पर्धेमध्ये तिने तिच्या वयाच्या पेक्षा वजनापेक्षा व जास्त वयाच्या मुलींना पराभूत करून ही ऐतिहासिक कामगिरी मिळवली. तिने प्रथम राजेवाडी जालना जिल्हा येथील राष्ट्रीय खेळाडू प्रिया घुसींगे हिला पराभूत केले. दुसऱ्या फेरीत बीड येथील राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते सोनाली मेंडके पराभूत केले. शेवटची कुस्ती बीड येथील गोल्ड मेडलिस्ट सोनाली पवार हिला पराभूत करून या मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले. (women wrestling for the first time in beed shruti bamnavat won the match)
या स्पर्धेमध्ये श्रुती चे वजन कमी असल्या कारणाने प्रथम स्पर्धा आयोजकांनी खेळण्यास नकार दिला. आयोजकांना विनंती करून तिचा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.श्रुतीने या स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कुस्त्या करून या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत श्रुतीने रोख रक्कम ३१ हजार रुपये व चांदीची गदा असे पारितोषिक मिळविले. या स्पर्धेच्या ठिकाणी हिंदकेसरी दीनानाथ सिंह कोल्हापूर व राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता डीवायएसपी राहुल आवारे उपस्थित होते व शेवटच्या पारितोषिक त्यांच्या वितरण करण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी येथील एका सर्वसामान्य घरातील मुलगी ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न बघत असून आणि ते स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा संकल्पही तिने केला आहे. महाराष्ट्र केसरी जिंकण्यासाठी श्रुतीने आतापासूनच मेहनत घेत आहे. कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांच्या काळात कुस्तीगिरांसाठी कसरत आणि खुराकासाठी लागणारा खर्च सरकार करत होते. परंतु या खेळांना आता नावापुरता राजाश्रय उरला आहे. कुस्ती रांगडा खेळ असला तरी त्याचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य घरातील मुलगी ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न बघते. मात्र घरची परिस्थिती नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. (women wrestling for the first time in beed shruti bamnavat won the match)
(बीडमध्ये प्रथमच महिला कुस्तीत श्रुती बामणवतने जिंकली सामना)