हिंगोली : महिला सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजना शासनाकडून राबवले जात आहेत. स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढली पाहिजे असं म्हटलं जात आहे. मात्र, तीच स्त्री महिला आज घडीला सुरक्षित नसल्याचे बघायला मिळते. दिवसेदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या चित्र बघायला मिळते.

हिंगोली तालुक्यातील लोहगाव शिवारात एका महिलेस धाक दाखवून मागील दहा महिन्यापासून अत्याचार करणार्‍या एका विरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस स्थानकात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. संतोष कोंडबा काळे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव पोलिसांनी सांगितले आहे.

भावाच्या मोबाईल लोकेशनवर पोहोचताच बहिण हादरली, औरंगाबादमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी घटना
लोहगाव येथील एक महिला रोज त्यांच्या शेतात जात होती त्यावेळी शेजारीच शेतात असलेल्या संतोष काळे याने त्या महिलेच्या शेतातील आखाड्यावर जाऊन त्या महिलेस चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला. त्यानंतरही आरोपीकडून सातत्याने असे प्रकार सुरू होते. जीवे मारण्याच्या धमकी मुळे तर महिलेने घडलेली सदर बाब कोणालाही सांगितले नाही. दरम्यान, भितीपोटी सदर महिला तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता झाली होती. त्यानंतर बुधवारी ती महिला गावात दाखल झाली.

सदर प्रकार तिने तिच्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले नंतर तक्रार दाखल करून पोलिसांनी संतोष काळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

धक्कादायक! विधवा आणि घटस्फोटीत २६ महिलांना दिले लग्नाचे आमिष; लुटले करोडो रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here