हायलाइट्स:

  • मुंबई वाहतूक पोलिसाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल
  • दिव्यांग व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करतानाचा व्हिडिओ
  • मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून व्हिडिओ केला शेअर
  • लोक म्हणाले, सॅल्यूट!, मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

मुंबई: एरवी रस्त्यावर वाहतूक पोलीस असले की, एक तर ते वाहतूक नियमनासाठी असावेत किंवा नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी असतात. त्यांना बघितलं की, अनेकांच्या मनात विचार सुरू होतो, ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? पीयूसीची मुदत संपली तर नाही ना? हेल्मेट घातलंय का?, सीटबेल्ट लावलंय ना, असे एक ना अनेक प्रश्न दुचाकी, चारचाकी चालकांना पडतो. मुंबईच्या रस्त्यांवर तर वाहतूक नियम मोडणाऱ्यांना काही दिवसांपासून पोलिसांनी दणका दिलाय. अशात आता वाहतूक पोलिसाचा एक ‘जबरा’ व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओतील वाहतूक पोलिसाची कृती ही हृदय जिंकणारीच आहे. इंटरनेटवर सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. (मुंबई ट्रॅफिक पोलिस वेगवेगळ्या सक्षम व्यक्तींना मदत करतात)

मुंबई पोलिसांच्या (मुंबई पोलीस) ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक वाहतूक पोलीस ‘विशेष’ व्यक्तीला मुंबईच्या वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या रस्ता पार करून देण्यात मदत करत आहे. या वाहतूक पोलिसाच्या कृतीनं सगळ्यांनी मनं जिंकली आहेत. हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सोनावणे असे या वाहतूक पोलिसाचं नाव आहे. ते एका विशेष व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील रस्ता ओलांडून देण्यास मदत करत आहेत.

Photo: पाळीव कुत्र्यानं वाचवले बाळाचे प्राण; मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर
३ वर्षांची लिलिका झाली २५० किलोची; दिवसाला खाते ६ किलो फळं

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या या व्हिडिओत मुंबईच्या सर्वाधिक वर्दळीच्या सीएसएमटी येथील रस्ता दिसतोय. हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सोनावणे हे एका दिव्यांग व्यक्तीच्या हाताला पकडून त्याला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करताना दिसत आहेत. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती सोनावणेंचे कौतुक करत आहे. ‘हॅट्स ऑफ’ असा आवाज या व्हिडिओत ऐकायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी राजेंद्र सोनावणे यांचे कौतुक केले आहे. मुंबई पोलिसांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एका ट्विटर यूजरने म्हटले आहे की, ‘आपल्या मुंबई पोलिसांना सॅल्यूट! इतरांसाठीही आदर्शवत असं उदाहरण…’ ‘मुंबई पोलीस फार छान काम करत आहात तुम्ही’ असं नितीन हिंदुराव देशमुख या यूजरनं म्हटलं आहे. त्यांनीच हा व्हिडिओ पहिल्यांदा ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ तुम्ही एकदा तरी पाहा! तुम्हीही या वाहतूक पोलिसाला सॅल्यूट ठोकाल!

OMG! स्वयंपाकगृहात सापडली सिक्रेट खोली; दरवाजा उघडताच महिलेला बसला असा झटका
shocking video: तरुणी बाईकवर करत होत्या Yoga; फ्रंट व्हिली मारताच गेला तोल, अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here