नवी दिल्ली: पुन्हा एकदा ‘झटका’ निर्णय जाहीर करत यांनी सर्व नागरिकांना धक्का दिला. ‘जान हैं, तो जहान है’ असं म्हणत मोदींनी आज (मंगळवारी) मध्यरात्रीपासून पुढचे २१ दिवस अर्थात १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा केली. हा एक प्रकारचा कर्फ्यूच असेल असं सांगायला पंतप्रधान मोदी विसरले नाहीत. अर्थातच या निर्णयामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी अगोदर घराबाहेर धाव घेत दुकानांसमोर गर्दी केलेली दिसली. त्यानंतर, लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे या नागरिकांना सबुरीचा सल्ला दिलाय.

नागरिकांनो,घाबरून जाण्याची काहीच आवश्यकता नाहीजीवनावश्यक वस्तू, औषधे इत्यादी उपलब्ध राहतील, हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकार एकत्रित समन्वयाने कार्य करतील.एकत्रितपणे आपण कोविड -१ शी मुकाबला करू आणि एक स्वस्थ भारत निर्माण करू जय हिंद!

असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here