औरंगाबाद : आपल्या १६ वर्षीय गतिमंद मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगत आई-वडिलांनीच फोटोला हार घालून सर्वांसमोर दिखावा करत असल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या वाळूज भागातील रांजणगावात समोर आली आहे. मात्र, काही तरुणांना हा मुलगा घाटी रुग्णालयासमोर आढळून आल्यानंतर निर्दयी आई-वडिलाचा हा सर्व संतापजनक कृत्य समोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव भागातील एका वासाहितीत राहत असलेल्या महिलेच्या पतीचे निधन झालं. त्यानंतर या महिलेने दुसऱ्या पुरुषाशी संसार थाटला. पण आपल्या पत्नीला पहिल्या पतीपासून असणाऱ्या गतिमंद मुलाची सावत्र बापाला अडचण होत होती. म्हणून त्याने शक्कल लढवत तीन महिन्यांपूर्वी १६ वर्षीय गतिमंद मुलाला ताप आल्याने घाटी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. त्यानंतर आठच दिवसाने आपल्या मुलाचा करोनाने मृत्यू झाला असून त्याचा अंत्यसंस्कार प्रशासनाने केल्याचा सांगून आई-वडिलांनी मुलाचा लोकांसमोर दहावा आणि तेरावासुध्दा केला.

भावाच्या मोबाईल लोकेशनवर पोहोचताच बहिण हादरली, औरंगाबादमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी घटना
पण याचवेळी ज्या भागात हा मुलगा राहत होता, त्याच भागातील काही तरुण घाटी रुग्णालयात काही कामासाठी आले असता त्यांना हा मुलगा भिक्षा मागताना पाहायला मिळाला. त्यांनी त्याला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र आई-वडिलांसोबतच जाणार असा हट्ट मुलाने धरला. त्यामुळे या तरुणांनी सर्व प्रकार मुलाच्या आई वडिलांना सांगत तुमचा मुलगा जिवंत असल्याची माहिती दिली. पण आमच्या मुलाचा करोनाने मृत्यू झाला असून तो दुसरा कुणी असेल असे सांगणाऱ्या आई-वडिलावर शेजाऱ्यांचा संशय आल्याने त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी खाकी दाखवताच आई-वडिलांनी आपण केलेल्या कृत्याची बाराखडी वाचली. तसेच पोलिसांच्या तंबीनंतर मुलाला घरी घेऊन आले.

महाराष्ट्र हादरला! चाकूचा धाक दाखवून महिलेवर सतत १० महिने केला बलात्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here