औरंगाबाद बातम्या आजच्या: इंजिनिअर विद्यार्थ्याच्या खुनाचा धक्कादायक खुलासा, मित्रानेच मित्राचा आधी गळा चिरला नंतर हातावर…. – aurangabad crime murder of an engineer student by friend as he asked for a loan
औरंगाबाद : २२ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासात उलगडा केला असून ६ हजार रुपयांसाठी मित्रानेच मित्राचा खून केल्याी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आनंद टेकाळे नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्राच्या वाढदिवसाला जात असल्याचे सांगत कृष्णा शेषराव जाधव १५ डिसेंबर रोजी घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्र होऊन कृष्णा घरी पोहचला नसल्याने घरच्यांनी अनेकदा त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन लागत नव्हता. मित्रांकडे विचारपूस केल्यानंतरही काहीच माहिती मिळत नसल्याने कृष्णाच्या कुटुंबातील सदस्यांनी सिडको पोलीस ठाणे गाठत, बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कृष्णाचा।मृतदेह हिमायतबाग परिसरात आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत कृष्णाचे कॉल डिटेल्स काढले होते. ज्यात कृष्णा आणि त्याचा मित्र आनंद टेकाळे यांच्यात शेवटचं संभाषण झाले असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आनंदला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता, आंनदकडे कृष्णाची ६ हजार रुपयांची उधारी होती. त्यामुळे कृष्णा सतत उधारीचे पैसे मागत असल्याने आंनदला याचा राग यायचा. म्हणून बुधवारी कृष्णाला दारू पाजतो म्हणून हिमायतबाग परिसरात आनंद घेऊन बसला. दारू पेत असतानाचा पुन्हा उधारीच्या पैश्यावरून वाद झाला आणि आनंदने कृष्णाचा थेट खून केला.
कृष्णा आणि आंनद दोघेही अनेक दिवसांपासून जवळचे मित्र होते. तसेच त्यांचे चांगले संबंध होते. मात्र आनंदने काही दिवसांपूर्वी कृष्णाकडून ६ हजार रुपये उधार घेतले होते. पण वेळेत देणं झालं नसल्याने कृष्णा सतत पैश्याची मागणी करत होता. त्यामुळे आनंदने कृष्णाला संपवण्याचा निर्णय घेतला.