हायलाइट्स:

  • रत्नागिरीतील चिपळूणमध्ये भीषण अपघात
  • भरधाव दुचाकीची अन्य एका दुचाकीला धडक
  • अपघातानंतर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू
  • दुचाकीचालकाविरोधात चिपळूणमध्ये गुन्हा दाखल

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील (रत्नागिरी) चिपळूण तालुक्यात (चिपळूण) भयंकर आणि विचित्र अपघात झाला. मिरजोळी ते विजापूर-गुहागर रस्त्यावर दोन दुचाकींची धडक झाली. या अपघातात ८३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या प्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीच्या चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मिरजोळी-विजापूर-गुहागर रस्त्यावर साईमंदिरनजीक काल, गुरुवारी दुपारी दोन दुचाकींमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. याबाबत काल रात्री उशिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. या अपघातात गुहागरच्या वडद सुतारवाडी येथील ८३ वर्षीय रामचंद्र शंकर पिंपळकर यांचा मृत्यू झाला. पिंपळकर हे दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसले होते. दुचाकीची धडक लागून झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

‘मातोश्री’चा आदेश घेऊन परब कोकणात; रामदास कदम समर्थकांचे पंख छाटले
भयंकर! आजोबासोबत दुचाकीवरून चालला होता १० वर्षांचा नातू, बल्करनं धडक दिली अन्…

याबाबत अधिक माहिती अशी की, जैद लियाकत कोलथरकर हे दुचाकीवरून मिरजोळी गाव ते विजापूर गुहागर रस्त्यावरून जात होते. साईमंदिर येथे ते आले असता, दुसऱ्या एका दुचाकीवरून येणारे प्रतीक प्रकाश पिंपळकर (वय ३०, सती भाग्योदय नगर, चिपळूण) यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातानंतर प्रतीकच्या पाठीमागे बसलेले रामचंद्र पिंपळकर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला मार लागला. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आरमाळकर करत आहेत.

रत्नागिरी: नगरपंचायत निवडणुकीआधीच कोकणातील वातावरण तापले
Ratnagiri : कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात २-३ ठिकाणी दरडी कोसळल्या

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here