औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील परिस्थिती पाहता पोलिसांचा वचक कमी झालाय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. टोळ्यांकडून होणारे राडे, व्यवसायिकांना मारहाण आणि त्यातच आता एका दिवसात दोन खून यावरून शहरातील परिस्थिती बिघडत चालली असल्याची प्रतिक्रिया सामान्य लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. गुरुवारी औरंगाबाद शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी खुनाच्या घटना घडल्या तर एका हॉटेलमध्ये टोळक्यानी चांगलाच धुडगूस घातल्याचं पाहायला मिळाले.

औरंगाबाद शहरातील वृत्तपत्रांचे पानं सद्या गुन्हेगारी वृतांनी भरलेले पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी घटना मोठ्याप्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात शहरातील कॅनॉट भागात एका हॉटलध्ये टोळक्यांनी राडा घालत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सूतगिरणी चौकात दोन गटात झालेल्या वादानंतर एकमेकांच्या डोक्यात काचेच्या बाटल्या फोडण्यात आल्या. त्यातच बुधवारी रात्री वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारमध्ये टोळक्यांनी धुडगूस घातला.

भावाच्या मोबाईल लोकेशनवर पोहोचताच बहिण हादरली, औरंगाबादमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी घटना
त्यातच गुरुवारी २२ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या हिमायतबाग परिसरात समोर आली. तर खुलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी येथील ६२ वर्षीय महिलेची आज्ञात व्यक्तीकडून हत्या करण्यात आली. एकाच दिवशी दोन खुनाच्या घटनेने औरंगाबाद हादरलं आहे.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

शहरातील छोटे-मोठे अवैध धंद्याना जणू उत आला आहे.ठीक-ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या हातगाड्या वाढल्या असून, दारूच्या नशेत गुन्हेगारी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण काही गोष्टी पोलीस दप्तरी नोंद होते तर काही होतच नाही. तर शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना काही थांबता थांबत नाही. त्यामुळे आता औरंगाबाद शहर पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

आई-वडिलांनी पोटच्या पोराचा जिवंतपणीच घातला तेरावा, काही दिवसांनी मुलगा परतला अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here