हायलाइट्स:

  • मुंबईत उपचार घेणारे १४ ओमिक्रॉनबाधित रुग्ण बरे
  • १३ रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले
  • रुग्णांमध्ये आढळली प्रमुख लक्षणे, डॉक्टरांनी दिली माहिती
  • राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांपैकी ५० टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच नाहीत

मुंबई: मुंबईसह राज्यभरात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत. मुंबईत आतापर्यंत १४ जणांना ओमिक्रॉनचा (ओमिक्रॉन) संसर्ग झालेला आहे. सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील १३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याचदरम्यान, ओमिक्रॉनची नेमकी लक्षणे काय आहेत, याची माहिती या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात ओमिक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रूग्णांमध्ये काही लक्षणे आढळून आली आहेत. त्यात काही प्रमाणात घशात खवखव, थकवा आणि अंगदुखी ही लक्षणे प्रामुख्याने रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. अंधेरीतील रुग्णालयात ओमिक्रॉनबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असून, आतापर्यंत १४ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यातील १३ रुग्णांना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

Omicron in Mumbai : ओमिक्रॉनचं सावट असताना मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा देणारी ‘ही’ आकडेवारी
Omicron in maharashtra update: राज्याला मोठा दिलासा! आज ओमिक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही, एकूण ३२ बाधित

मुंबईत आढळलेल्या १४ रुग्णांपैकी आठ जणांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. तर ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली, त्यात प्रामुख्याने घशात खवखव, थकवा आणि अंगदुखी ही लक्षणे दिसून आली, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. या व्यतिरिक्त त्यांच्यात कोणतेही आजार दिसून आलेले नाहीत. फुफ्फुसावर कोणताही परिणाम झालेला नव्हता, असे तपासणी अहवालात दिसून आले आहे. याचाच अर्थ साधारण ताप आणि अंगदुखीवर औषधोपचार करण्यात आले. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांना मल्टिव्हिटॅमिन देण्यात आले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

new restriction for omicron: मुंबईकरांसाठी मोठी बातमी; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आले नवे निर्बंध, पाहा, संपूर्ण नियमावली!
मुंबईतील उपनगरी लोकलमधून लसीकरण प्रमाणपत्राविना प्रवासाला लोकलमुभा?

महाराष्ट्रात आतापर्यंत ३२ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, ओमिक्रॉनच्या ५० टक्के रुग्णांमध्ये एकही लक्षण आढळून आलेले नाही. पहिल्या दिवशी रुग्णाला सौम्य ताप, सर्दी आणि खोकला ही लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात. विशेष म्हणजे, वास न येणे हे कोविड १९ चे लक्षण असले तरी, ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये हे लक्षण आढळून आले नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. महाराष्ट्रात आढळून आलेल्या ३२ रुग्णांमधील २५ रुग्णांचे लसीकरण झालेले आहे. तर यातील पाच हे अल्पवयीन आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here