मुंबई : बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान याचे चाहते केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत. ज्या सिनेमांत सलमान असतो त्या सिनेमांना त्याचे चाहते डोक्यावर उचलून घेतात. म्हणजे सलमान असेल तर तो सिनेमा हमखास यशस्वी होणार हे समीकरण दृढच आहे. त्यामुळेच गेल्या ११ वर्षांत सलमानने १५ सिनेमांत काम केलं. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्याच्या अनेक सिनेमांनी १०० ते २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर काही सिनेमांनी तर ३०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले.

मिया खलीफाने लाखो रुपये खर्च करून केलेलं ब्रेस्ट इम्प्लांट?

५५ व्या वर्षीही आहे सलमानचाच जलवा

बॉलिवूडचा असा हा सुपरस्टार सलमान खान येत्या २७ डिसेंबरला ५६ वा वाढदिवस साजरा करणार आहे. आजही कोणताही सिनेमा करताना सलमानचा वय हा मुद्दा कधीच आड आला नाही. ना त्याला ना कधी त्याच्या चाहत्यांना… सलमानचा सिनेमा कधी येतो याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष असतं. त्यामुळेच ५५ व्या वर्षीही सलमानचा जलवा कायम आहे.


आयुषने सलमानबद्दल केला मोठा खुलासा

आजही सलमानचा स्वॅग पाहून त्याचे चाहते प्रचंड आनंदी होतात. स्वॅगमध्ये दिसणारा सलमान खऱ्या आयुष्यात मात्र कमालीचा साधा आहे. त्याचे राहणीमान अतिशय साधे आहे. ते कसे, याचा खुलासा खुद्द सलमानच्या मेहुण्याने म्हणजे आयुष शर्माने केला आहे. आयुष हा सलमानची बहिण अर्पिता हिचा नवरा आहे. सलमान आणि आयुष यांचे नाते केवळ इतक्या पुरतेच सीमित नाही. तर आयुषने सलमानसोबत ‘अंतिम’ सिनेमातही सहकलाकार म्हणून काम केले आहे.

सलमान जमिनीवर झोपतो!

एका मुलाखतीमध्ये आयुषने सांगितले की, सुपरस्टार असूनही सलमान कमालीचा साधा आहे. जेव्हा केव्हा सलमानला झोप येते तेव्हा त्याला आलिशान बेड, चांगल्या गाद्या, उश्या लागत नाहीत. तर तो सरळ फरशीवर आडवा होतो आणि झोपून जातो.


कसलाही शौक नाही

आयुषने या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, ‘भाईला कोणत्याही गोष्टीचं विशेष आकर्षण नाही. ना फोनचं, ना गाड्यांचं, ना कपड्यांचं… त्याला फक्त एकच गोष्ट आवडते ती ती म्हणजे सिनेमे पाहणं. तो तासन् तास बसून सिनेमे पाहतो.’ सलमानला कधीही एकटेपणा जाणवत नाही. कारण तो जेव्हा जेव्हा एकटा असतो तेव्हा तो सिनेमेच पाहत असतो.’

पैसा बोलता है! एका जाहिरातीसाठी कतरिना कैफ किती घेते मानधन

या गोष्टीसाठी घरातल्यांना करावी लागते जबरदस्ती

आयुषने मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, ‘सलमानची खासगी जिम आहे. पण ही जिमदेखील अगदी साधी आहे. घरातल्यांनी खूपच आग्रह केल्यानंतर त्याने नवीन गाडी विकत घेतली होती.’

सलमान खान

२०१४ मध्ये झालं लग्न आयुष – अर्पिताचान

आयुषने २०१४ मध्ये सलमानची बहिण अर्पिता हिच्याशी लग्न केलं. त्यानंतर तो खान कुटुंबातील एक सदस्य झाला. सलमानला खाण्याचीही फार आवड नाही. त्याला केवळ घरी तयार केलेलंच जेवायला आवडतं. हे जेव्हा त्याला मिळते तेव्हा तो प्रचंड आनंदात असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here