हायलाइट्स:
- पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर
- घरात घुसून महिलेवर बलात्कार
- आरोपीला पोलिसांनी केली अटक
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलिसांनी आरोपी राजेंद्र नागनाथ जाधव (वय-४०, रा-सुसगांव, मुळशी) याला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० ते १२.५० वाजताच्या दरम्यान आरोपी राजेंद्र जाधव हा २६ वर्षीय महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने महिलेला ओढत दुसऱ्या खोलीत नेले व दरवाजा आतून बंद करून तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकरणी आरोपीवर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर व पोलीस उपनिरीक्षक काकडे हे करत असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.