हायलाइट्स:
- दुबईहून परतलेल्या ७ प्रवाशांना ओमिक्रॉनची लागण
- बाधित रुग्णांच्या संपर्कात ६० ते ७० अन्य व्यक्ती?
- पुण्यात धोका वाढला
दुबईहून परतलेल्या या प्रवाशांची ११ आणि १२ डिसेंबर रोजी नारायणगाव जुन्नर येथे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर NIV चा अहवाल आज हाती आला. या अहवालातून सात जणांना ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.
बाधित रुग्णांना नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे ७ रुग्ण तब्बल ६० ते ७० जणांच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मागील शनिवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आता ओमिक्रॉनचे एकाच वेळी सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.