बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार सदाशिवनगर बंगळूर इथे घडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खरंतर, गेल्या अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्नही कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून होत आहे. यावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेनंतर परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाले असून अनेकांनी धर्मवीर संभाजी चौकामध्ये जमून रस्ते बंद केले. दगडफेकीच्या घटनाही यावेळी समोर आल्या. त्यामुळे शनिवारी बेळगावमध्ये शहर बंद असल्याचं वातावरण पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे. सकाळपासूनच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहत आहेत तर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी यास पाठिंबा द्यावा असे आवाहनही करण्यात आलं आहे.

हा खेळ कुणाला परवडणार नाही; ओबीसी आरक्षणावरून जयदत्त क्षीरसागर आक्रमक
कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथील सदाशिवनगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कर्नाटकातील गुंडांनी विटंबना केल्यानंतर कोल्हापूरातही शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील कर्नाटक व्यावसायिकांची हॉटेल बंद केली.

युवा सेनेचे हर्षल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरीतील कर्नाटक व्यावसायिकांची हॉटेल बंद केली. छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची विटंबना केली असून हॉटेल बंद करा असे हॉटेल मालकांना सांगितले आणि शिवसैनिकांनी हॉटेलची शटर बंद केली. त्यानंतर शिवसैनिकांनी शिवाजी चौकात कर्नाटकातील गुंडाच्या कृत्याचा निषेध करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. यापुढे कर्नाटकला जसास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

इम्पीरिकल डेटा म्हणजे काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here