हायलाइट्स:

  • दापोली नगरपंचायत निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग
  • दापोली निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार
  • सत्ताधाऱ्यांवर भाजपचे गंभीर आरोप
  • बिल्डर लॉबीच्या हातात सत्तेच्या चाव्या जावू देणार नाही- भाजप

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत (दापोली नगर पंचायत निवडणूक) राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. तर भाजप स्वतंत्रपणे जागा लढवत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे (भाजप) केदार साठे यांनी नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांवर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत.

दापोली नगरपंचायतीची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असून कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिने झालेले नाहीत. दिवाळीचा बोनस द्यायला पैसे नाहीत. वीज बिल भरायलाही पैसे नाहीत. काही नगरसेवकच कंत्राटदार झालेत, असा गंभीर आरोप केदार साठे यांनी केला. यावेळी भाजपचे श्रीराम ईदाते, संदीप केळकर, संजय सावंत, अजू साळवी आदी उपस्थित होते. दापोली नगरपंचायतीच्या बिल्डर लॉबीला येथील जनता सत्तेत येऊ देणार नाही. आम्ही नगरपंचायतीचे मालक असल्याच्या थाटात काही नगरसेवक वावरतात, तसे सभेतही बोलतात हे दुर्देवी आहे, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षण संपवलं; भाजप नेते आशिष शेलार यांची टीका
‘मातोश्री’चा आदेश घेऊन परब कोकणात; रामदास कदम समर्थकांचे पंख छाटले

नगरपंचायतीच्या असलेल्या मुदतठेवीही येथील सत्ताधाऱ्यांनी मोडीत काढल्या. ही येथील भयानक स्थिती आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी करोना काळात दिवसरात्र काम केले, त्यांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत. आर्थिक स्थिती सत्ताधाऱ्यांनी दयनीय केली आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्ष एकत्र आलेत. बिल्डर लॉबीच्या हातात नगरपंचायत कारभार गेल्यास शहराची अवस्था दयनीय होईल. येथील जनता हे ओळखून आहे. पहिल्यांदाच प्रचार सभेला पालकमंत्री अनिल परब सांगत आहेत, आम्ही नगरपंचायतीला निधी दिला. जनतेची दिशाभूल करणारी माहिती सत्ताधारी देत असल्याचा आरोप भाजप जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी केला.

येथील निवडणुकीत आपला नेता कोण, पक्ष कोणता याचीच माहिती नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली. भाजप फक्त विकासाचा मुद्दा घेऊन १२ जागांवर निवडणूक लढवत आहे, सत्तेत भाजपच बहुमताने येईल, असा दावा त्यांनी केला. पालकमंत्री अनिल परब विकासासाठी निधी दिल्याची चुकीची माहिती देत आहेत, असे साठे म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात नगरपंचायतीला फक्त ठोस निधी प्राप्त झाला, असा दावाही साठे यांनी केला. दोन वर्षांपूर्वी मागील युती सरकारमध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नारगोली धरणासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर केला. तो योग्य प्रकारे खर्च न झाल्याचे कारण देत या आघाडी सरकारने व्याजासह वसूल केला आहे. तब्बल ७२ लाख रुपये नगरपंचायत प्रशासनाला भरावे लागले, असे साठे म्हणाले.

रत्नागिरी: नगरपंचायत निवडणुकीआधीच कोकणातील वातावरण तापले

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here