औरंगाबाद : नात्या-गोत्यातील वाद काही नवीन नाही. पण एखाद्या वादातून थेट नातेवाईकाला जिवंतपणी मृत्यू झाल्याचं सिद्ध करून त्याची सरकारी नोकरी घालवणारे नातेवाईक पहिल्यांदाच पाहायला मिळाले. असंच काही औरंगाबादच्या मनोज आदेश कुलकर्णी नावाच्या ३५ वर्षीय व्यक्तीसोबत घडलं आहे.

शुक्रवारी औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात आत्मदहन करण्यासाठी आलेल्या मनोज यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्यानं म्हंटल आहे की, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळात लिपिक म्हणून तो कामाला होता. पण काही नातेवाईकांनी सुरवातीला तो मसिंग झाल्याची खोटी नोंद परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे नोंदवली. त्यानंतर मनोज यांच मृत्यू झाल्याचा खोटा प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयात दिल्याने त्यांची नोकरी गेली, असल्याचा आरोप मनोज यांनी आरोप केला आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीची प्रतिमा पुन्हा मलिन ; शहर सचिव अडकला खंडणीत
त्यामुळे आता नोकरी गेल्याने हतबल झालेल्या मनोज यांनी आपल्या विरोधात कट रचणाऱ्या नातेवाईकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पण पोलीस आयुक्त कार्यालयाच्या गेटवर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची समजून घालून मनपरिवर्तन केलं. त्यामुळे त्यामुळे त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतल्याचं लेखी पोलिसांना दिला.पण नातेवाईकांनी काढलेली खुन्नस चर्चेचा विषय बनला होता.

हा खेळ कुणाला परवडणार नाही; ओबीसी आरक्षणावरून जयदत्त क्षीरसागर आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here