औरंगाबाद : जो प्रयत्न अमरावतीत झाला तो पुन्हा जर महाराष्ट्रात झाला तर सोडायचं नाही, असं वक्तव्य करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी असं वक्तव्य केल्याचं बोलले जात आहे.

सोशल मीडियावर राज ठाकरेंची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यात ते कार्यकर्त्यांना बोलताना म्हणतायत की, तुमच्या साक्षीने एकच वाक्य सांगतो, जो प्रयत्न अमरावतीमध्ये झाला तो प्रयत्न पुन्हा महाराष्ट्रात जर झाला तर सोडायचं नाही. परत असं झालं तर आपल्या प्रत्येक मनसैनिकांना सांगायचं आपल्या घरावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा सतत फडकत राहिला पाहिजे. नवीन वर्षापासून धुमधडाका सुरू करू, असेही राज ठाकरे म्हणाले.

खुन्नस! जिवंत व्यक्तीचं खोटं मृत प्रमाणपत्र बनवून त्याच्या कार्यालयात दिलं आणि….
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणतायत, माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, लोकांचा विश्वास संपादन करा. एकदा विश्वास संपादन केला तर निवडणुकीत तुम्हाला मत मागण्याची गरज पडणार नाही. सगळी राजकारणी तुम्हाला जाती-जातीत विभागून ठेवत आहे, असेही यावेळी ठाकरे म्हणाले.

हा खेळ कुणाला परवडणार नाही; ओबीसी आरक्षणावरून जयदत्त क्षीरसागर आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here