हिंगोली : देशाचे जवान जीवाची परवा न करतां सीमेवर आपल सरक्षण करत असतात. त्यांच्याबद्दल सर्वांना जिव्हाळा, आपुलकी आहे. सगळीकडे सन्मान मिळत असतो, असाच सन्मान आणि देशाची सेवा करता यावी असं स्वप्न उराशी बाळगणार्‍या हिंगोलीच्या एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे.

बीएसएफ भरती प्रक्रियेत वैद्यकीय चाचणीत अनुत्तीर्ण झाल्याने निराश होऊन हिंगोली तालुक्यातील अंधारवाडी येथील संतोष ज्ञानेश्वर इंगळे या २२ वर्षीय तरुणाने नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. संतोष इंगळे हा मागील काही वर्षापासून सैन्य भरतीची स्वप्ने उराशी बाळगून होता.

जिल्ह्यात राष्ट्रवादीची प्रतिमा पुन्हा मलिन ; शहर सचिव अडकला खंडणीत
सैन्यात भरती होण्याचा चंग त्यांनी बांधला होता. त्यामुळे तो जोरदार तयारी सुद्धा करीत होता. त्याने बीएसएफ साठी अर्ज भरल्यानंतर नाशिक येथे परीक्षा झाली होती. त्यानंतर नागपूर येथे मेडिकल झाले होते. मेडिकलमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने तो निराश झाला होता. यातून ६ डिसेंबर रोजी शेतात असताना विषारी औषध घेतले.

नातेवाइकांनी तात्काळ उपचारासाठी नांदेड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान १३ डिसेंबर रोजी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या प्रकरणी अधीक तपास पोलिस करीत आहेत.
हा खेळ कुणाला परवडणार नाही; ओबीसी आरक्षणावरून जयदत्त क्षीरसागर आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here