औरंगाबाद : वाढदिवसाचा केक तलवारीने कापण्याचा क्रेज गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. आता अशीच एक घटना औरंगाबादमध्ये समोर आली असून, वैजापूरच्या एका तरुणाचा वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ महाराष्ट्र टाईम्सच्या हाती लागला आहे.
जिल्ह्यात शस्त्रबंदी लागू…
विशेष म्हणजे जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ११ डिसेंबर ते २५ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आणि शस्त्र बंदी कायदा लागू आहे. त्यामुळे या काळात पाच पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी जमा होता येत नाही. तसेच कोणतेही शस्त्र वापरता येत नाही.