कोणती दुकानं खुली राहतील?
आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बंद होणार नाहीत. सोबतच मेडिकल, लॅब आणि रेशनिंग दुकानंही सुरू राहतील. तुम्हाला डॉक्टरांकडेही जाता येईल. रुग्णालय, दवाखाने, डिस्पेन्सरी, नर्सिंग होम सुरू राहतील. पेट्रोल, सीएनजी, एलपीजी यांसारख्या सुविधा सुरू राहतील. खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे ही दुकानं सुरू राहतील.
या गाड्यांना प्रवासासाठी सूट
खासगी गाड्यांना अतिशय आवश्यक असेल तेव्हाच रस्त्यावरून प्रवासासाठी परवानगी असेल. लोकांना केवळ मेडिकल, रेशनिंग, औषधं, दूध आणि भाज्या खरेदीसाठी बाहेर पडण्याची परवानगी असेल. खाद्यपदार्थ, औषधं, मेडिकल इक्विपमेंट यांचा पुरवठा ई-कॉमर्सद्वारे ऑनलाईन पद्धतीनं सुरूच राहील. अॅम्बुलन्स सेवाही सुरू राहील. मेडकल कर्मचारी, नर्स, पॅरा-मेडिकल स्टाफ आणि रुग्णालयाचा सपोर्ट स्टाफ केवळ यांनाच प्रवासाची मुभा असेल
कुठे जाण्याची परवानगी नाही?
सार्वजनिक स्थळं उदाहरणार्थ मॉल, हॉल, जिम, स्पा, स्पोर्टस क्लब बंद राहतील. सर्व रेस्टॉरन्ट, दुकानं इत्यादी बंद राहतील. शिक्षण संस्था, ट्रेनिंग, रीसर्च, कोचिंग संस्था बंद राहतील. धार्मिक आणि पूजास्थळ बंद राहतील. कोणत्याही धार्मिक कार्यक्रम आयोजनाची परवनागी नाही. सामाजिक, राजकीय, स्पोर्टस, एन्टरटेन्मेट, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी कार्यक्रमांना परवनागी नसेल.
एखाद्याच्या अंत्यविधीसाठीही २० पेक्षा जास्त लोकांना सहभागी होण्याची परवानगी नाही.
हॉटेल सुरू राहणार
लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या पर्यटकांसाठी आणि इतरांसाठी, मेडिकल आणि एमर्जन्सी स्टाफ, वायु-जल परिवहनाच्या क्रू साठी हॉटेल, होम स्टे, लॉज आणि मोटल सुरू राहतील. क्वारंन्टाईन सुविधेसाठी वापरल्या जाणाऱ्या इमारतीही सुरू राहतील.
बस-ट्रेनचं काय?
देशातील सर्व ठिकाणची सार्वजनिक परिवहन सेवा बंद राहणार आहे. बस किंवा रेल्वे बंद ठेवण्यात येतील.
कोणते कार्यालय सुरू राहतील?
किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या, किमान मनुष्यबळासहीत शासकीय लेखा-कोषागरं आणि संबंधित कार्यालय, वाणिज्य दूतावा, परकीय संस्थांची कार्यालय सुरू राहतील.
प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया काम करत राहील. टेलिकम्युनिकेशन, ब्रॉडकास्टिंग सेवा, केबल, आयटी सेवा सुरू राहतील. त्यामुळे वर्क फ्रॉम होम शक्य होईल. सिक्युरिटी अॅन्ड एक्सजेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या आदेशानुसार, कॅपिटल आणि डेट मार्केट सर्व्हिस सुरू राहील.
कोल्ड स्टोअरेज आणि वेअरहाऊस सुरू राहतील. खासगी सिक्युरिटी सेवा सुरू राहतील.
काय राहणार बंद?
सर्व फॅक्टरी, वर्कशॉप, कार्यालय, गोडाऊन, आठवडा बाजार बंद राहतील. खासगी आणि व्यावसायिक संस्था बंद राहतील.
इथे काम सुरू राहणार
डिफेन्स, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राजकोष, डिझास्टर मॅनेजमेंट, वीज उत्पादनं आणि ट्रान्समिशन युनिट, पोस्ट ऑफिस, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर सुरू राहतील. पोलीस, होम गार्ड, सिव्हिल डिफेन्स, अग्निशमन दल आणि अत्यावश्याक सेवा, तुरुंग, जिल्हा प्रशासन, राजकोष, वीज, पाणी आणि सॅनिटेशनचं काम सुरू राहील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times