हायलाइट्स:

  • ओमिक्रॉनचं संकट, मुंबईची चिंता वाढली
  • अमेरिकेहून आलेल्या तरूणाला ओमिक्रॉनचा संसर्ग
  • करोना प्रतिबंधक लसीचे तीन डोस घेऊनही तरूण बाधित
  • तरूणामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, पण रुग्णालयात दाखल

मुंबई : करोनाचा (कोरोना) नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे (ओमिक्रॉन) मुंबईसह राज्यभरात धाकधूक वाढली आहे. राज्यात ओमिक्रॉनबाधितांची संख्या ४० वर पोहोचलेली असतानाच, आता धडकी भरवणारे वृत्त आले आहे. मुंबईत अमेरिकेहून परत आलेल्या एका २९ वर्षीय तरूणाला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे. धक्कादायक म्हणजे, त्याने करोना प्रतिबंधक लशीचे तीन डोस घेतलेले आहेत. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, या तरूणामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. मात्र, रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

एका रिपोर्टनुसार, मुंबई महापालिकेने माहिती दिली की, ९ नोव्हेंबर रोजी विमानतळावर करोना चाचणी करण्यात आल्यानंतर या तरूणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. तर या तरूणाच्या संपर्कात आलेल्या दोन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.

Omicron in Mumbai : ओमिक्रॉनचं सावट असताना मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा देणारी ‘ही’ आकडेवारी
16 Students Tested Corona Positive: धक्कादायक बातमी! नवी मुंबईतील एकाच शाळेत १६ विद्यार्थ्यांना करोना, ६०० विद्यार्थ्यांची होणार चाचणी

संबधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. मुंबईत करोनाच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनबाधित रुग्णांची एकूण संख्या आता १५ वर पोहोचली आहे. कोणत्याही रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत. महाराष्ट्रात आता एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ४०वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेहून मुंबईत आलेल्या २९ वर्षीय तरूणाचा चाचणी अहवाल आला असून, तो ओमिक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने करोना प्रतिबंधक लशीचे तीन डोस घेतलेले आहेत. न्यूयॉर्कहून तो मुंबईत आला होता. आरटीपीसीआर चाचणीसाठी त्याचे नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यात पाठवण्यात आले. अहवालात त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. बीएमसीने सांगितले की, रुग्णाने लशीचे दोन डोस घेतलेले आहेत. त्यानंतर त्याने अतिरिक्त सुरक्षेसाठी बुस्टर डोसही घेतला होता.

ओमिक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता, पण लाट नाही

राज्याच्या टास्क फोर्सच्या एका सदस्याने शुक्रवारी सांगितले की, पुढील दोन ते तीन महिन्यांत ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, पुन्हा लाट येईल अशी कोणतीही शक्यता नाही. समूह संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. करोना नियमांचे काटेकोर पालन करण्यावर जोर दिला जात आहे. तर लसीकरणावरही भर दिला जात आहे. गर्दी टाळावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक लक्ष असणार आहे, त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे, असेही या सदस्याने सांगितले.

राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५२५ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी ७९ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

जिल्ह्यात ओमायक्रॉनचे सहा रुग्ण
नववर्ष, नाताळच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध?; राजेश टोपे म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here