मुंबई-रामायण‘ सारख्या धार्मिक मालिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्रा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर शेअर केलेलेतिचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. नुकतीच साक्षी मुंबईत दिसली. यावेळी मुंबईच्या रस्त्यांवर अगदी बोल्ड अंदाजात आत्मविश्वासाने फिरतानाचे तिचे अनेक फोटो कॅमेऱ्यात कैद झाले.

साक्षी चोप्रा

साक्षी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कुटुंबातील एक सदस्य आहे. मात्र असं असूनही साक्षी सिनेमे आणि टीव्ही जगतापासून दूर आहे. साक्षी चोप्रा ही टीव्ही निर्माती मीनाक्षी सागर यांची मुलगी आहे, जी रामानंद सागर यांची नात आहे. साक्षी मॉडेल असण्यासोबतच गायिका आणि गीतकार देखील आहे. साक्षीने लंडनच्या ट्रिनिटी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर कॅलिफोर्नियातील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून फिल्म मेकिंगचा कोर्स केला.


साक्षी चोप्राला बॉलीवूडमध्ये फारसा रस नसला तरी तिला चित्रपटात पाहण्याची इच्छा अनेक चाहत्यांची आहे. साक्षी सोशल मीडियावर सक्रीय असून बोल्ड फोटोंमुळे तिला अनेकदा टीकेला सामोरं जावं लागतं. साक्षीच्या इन्स्टाग्राम फॅन फॉलोअर्सबद्दल सांगायचे तर, तिला ५ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. याशिवाय साक्षीचे स्वतःचे यूट्यूब चॅनल आहे आणि तिथेही तिला फॉलो करणाऱ्या लोकांची कमी नाही.

साक्षी चोप्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here