नवी दिल्ली : करोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजूनही थांबयचं नाव घेताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. मंगळवारपर्यंत या संख्येनं ५०० चा आकडा ओलांडलाय तर १० जणांचा ”नं बळी घेतलाय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
>> १५ एप्रिलपर्यंत नागरिकांना घरातून बाहेर पडण्यावर बंदी

>> कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून दूर राहा! सरकारनं केलेल्या सूचनांचं पालन करणं गरजेचं

>> २१ दिवसांचा लॉकडाऊन हा मोठा काळ आहे. मात्र, तुमच्या सुरक्षेसाठी, कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा आहे. हाच एकमेव मार्ग आहे

>> घरात राहून त्या लोकांबद्दल विचार करा जे सध्या आपला जीव धोक्यात घालून एक एक जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र रुग्णालयात काम करत आहेत

>> जान हैं, तो जहाँ है… धैर्य आणि अनुशासनाची हीच वेळ… देशात लॉकडाऊनची स्थिती असेपर्यंत आपला संकल्प पूर्ण करायचा आहे

>> घरात राहा, घरात राहा आणि एकच काम करा ते म्हणजे केवळ घरात राहणं… आजच्या निर्णयानं देशव्यापी लॉकडाऊननं तुमच्या घराच्या दरवाज्यावर एक लक्ष्मण रेखा आखलीय

>> आपल्याला काहीही झालं तरी घरातून बाहेर पडायचं नाही… सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे

>> घराची लक्ष्मणरेखा पार केली नाही तरच करोनाचं संक्रमण थोपवता येईल

>> करोना संक्रमित व्यक्ती सुरुवातीला स्वस्थ असल्याचं दिसतं, तो संक्रमित आहे हे समजतदेखील नाही. त्यामुळे सावधानता बाळगा आणि आपल्या घरातच राहा

>> पुढचे २१ दिवस घरातून बाहेर पडण्याचं विसरून जा… घरात राहा… आज रात्री १२.०० वाजल्यापासून घरातून बाहेर पडणं पूर्णत: बंद होणार

>> आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, करोना व्हायरसचं जाळं तोडण्यासाठी २१ दिवसांचा काळ महत्त्वाचा आहे

>> हा लॉकडाऊन पुढचे २१ दिवस अर्थात तीन आठवड्यांचा असेल : मोदी

>>आज रात्री १२.०० वाजल्यापासून संपूर्ण देशात संपूर्ण लॉकडाऊनची पंतप्रधानांची घोषणा

>> देशाला वाचवण्यासाठी, देशातील प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकावर घरातून बाहेर पडण्याची बंदी लावली जात आहे

>> प्रत्येक भाग, प्रत्येक जिल्हा प्रत्येक राज्य आणि संपूर्ण देशात हा लॉकडाऊन घोषित केला जातोय : मोदी

>> बेपर्वाई अशीच सुरू लागली तर देशाला त्याची किती किंमत चुकवावी लागेल, याचा अंदाजाही लावणं कठीण : मोदी

>> देशावर संकट आल्यावर सगळे नागरिक एकत्र झाले

>> करोनाचा प्रसार अत्यंत वेगानं होतंय… या रोगाला हरवण्यासाठी विलगीकरण हा एकच उपाय आहे

>> देशावर संकट आलं, मानवतेवर संकट आलं तर आपण सर्व भारतीय एकत्र येऊन कसा त्याचा मुकाबला करतो हे ‘जनता कर्फ्यू’द्वारे भारतानं दाखवून दिलं

>> २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार

Live अपडेट

>> ‘जागतिक साथीचा आधार असलेल्या करोना विषाणूच्या उद्रेकाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी मी देशातील नागरिकांना सांगणार आहे. आज, २४ मार्चच्या रात्री ८ वाजता मी देशाला संबोधित करेन’ असं ट्विट पंतप्रधानांनी केलंय.

>> प्रत्येक राज्यातील अर्थ स्रोत रुग्णालय, क्लिनिकल लॅब यांसारख्या अतिरिक्त मेडिकल सुविधा विकसित करण्यासाठी खर्च व्हावेत तसंच सद्य सुविधा अदययावत करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश

>> आजच्या संबोधनात नागरिकांमध्ये करोनाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करतील, असं सांगितलं जातंय.

>> देशभरातील ३२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील तब्बल ५६० जिल्ह्यांत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय.

>> महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, चंदीगड आणि पुदुच्चेरी मध्ये सरकारनं ३१ मार्चपर्यंत राज्यात कर्फ्यू घोषित केला आहे.

>> महाराष्ट्र राज्यात संक्रमित आणखीन चार रुग्ण आढळळ्यानंतर राज्यातील करोनाबाधितांची संख्या १०१ वर पोहचली आहे.

>> यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशाला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचं तसंच टाळ्या आणि थाळ्या वाजवत करोनाशी लढणाऱ्या ‘देशाच्या शक्तीं’प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here