लातूर : शहरापासून जवळच असलेल्या कव्वा शिवारातील तळ्यात दोन्ही हात बांधून टाकलेला अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. हात बांधले असल्याने ही घातपाताची शक्यता असल्याचे स्पष्ट होत असल्याने स्थानिक नागरिकांनी घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना दिली आहे.

माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनासाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले आले. आज दुपारच्या सुमारास हा मृतदेह तलावात आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.

मयत व्यक्तीचे नाव महेश दत्तात्रय लांडगे (24) आहे. मयत महेश लांडगे शिरशी धानोरा येथील रहिवासी असून तो माताजी नगर मध्ये राहत होता. या प्रकरणी पुढील तपास लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here