सध्या सिंधुदुर्गात जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्यानिमित्ताने स्थानिक राजकारण तापले आहे. शिवसेना आणि राणे समर्थकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांचे निवडणुकीतील प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर शनिवारी तलवारीने हल्ला करण्यात आला होता. जिल्ह्यातील विरोधकांनी गुंडांकरवी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप सावंत यांनी केला होता. जिल्ह्यातील विरोधकांनी गुंडांकरवी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप सावंत यांनी म्हटले होते.
वैभव नाईकांचा राणेंना इशारा
या सगळ्या प्रकारानंतर शिवेसना आमदार वैभव नाईकही आक्रमक झाले होते. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेत चांगले काम केले असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभवाच्या भीतीने नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले. संतोष परब यांच्यावर हल्ला करून जिल्हा बँकेसारख्या निवडणुकीत राणे दहशत निर्माण करत आहेत. मात्र, या दहशतीला शिवसेना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा वैभक नाईक यांनी दिला होता.
Home Maharashtra narayan rane: नारायण राणेंनी कोकणात पुन्हा रक्तरंजित राजकारणाला सुरुवात केलेय, विनायक राऊतांचा...
narayan rane: नारायण राणेंनी कोकणात पुन्हा रक्तरंजित राजकारणाला सुरुवात केलेय, विनायक राऊतांचा हल्लाबोल – shiv sena mp vinayak raut take a dig at narayan rane and nitesh rane
सुरेश कोळगेकर, सिंधुदुर्ग : नारायण राणे आणि नितेश राणे या पिता-पुत्रांनी कोकणात पुन्हा एकदा रक्तरंजित राजकारणाला सुरुवात केल्याची जळजळीत टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांमुळे सध्या स्थानिक वातावरण तापले आहे. याच तणावातून शनिवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष व शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या निकटवर्तीयावर तलवारीने हल्ला करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी राणे कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले.