पुस्तक वाचतानाचा स्वत:चा एक फोटोच शरद पवार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ‘चला करोनाशी लढूया’ असं आवाहन त्यांनी फोटोच्या माध्यमातून केलं आहे. घरात बसून काय करायचं असं प्रश्न अनेकांना पडलेला आहे. शक्य आहे ती मंडळी घरात बसून कार्यालयीन कामं करत आहेत. मात्र, ज्यांना ती सोय नाही, त्यांच्यापुढं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. एकमेकांना फोन करून लोक वेळ घालवण्याच्या टिप्स घेत आहेत.
वाचा:
याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ट्विट केलं आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी घरात बसण्याची वेळ आल्यावर तुम्ही काय करता असं लोक मला विचारतात. मी घरी पुस्तक वाचतो. पुस्तक हा माणसाचा खूप चांगला मित्र आहे,’ असं त्यांनी म्हटलंय. ‘घरातच थांबा, सुरक्षित राहा,’ असंही त्यांनी पुढं म्हटलंय.
वाचा:
दरम्यान, राज्यात करोनाची लागण होण्याच्या घटना सुरूच असून रोजच्या रोज नवनवे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील करोना रुग्णांची संख्या आतापर्यंत १०७वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक मुंबईतील रुग्ण आहेत. त्या खालोखाल पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधित आढळले आहेत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे उपचारानंतर रुग्ण बरे होत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. आजही १५ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times