बंगळुरुच्या सदाशिवनगरमध्ये गुरुवारी रात्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर बेळगावसह सीमाभागात तीव्र पडसाद उमटले होते. येथील मराठी बांधव या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. अशातच बसवराज बोम्मई यांच्या यांच्या वक्तव्यामुळे आगीत आणखीनच तेल ओतले गेले.

महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारतातल्या हिंदूंचे छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत.
हायलाइट्स:
- बंगळुरुच्या सदाशिवनगरमध्ये गुरुवारी रात्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती
- हा प्रकार समोर आल्यानंतर बेळगावसह सीमाभागात तीव्र पडसाद उमटले होते
बंगळुरुच्या सदाशिवनगरमध्ये गुरुवारी रात्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर बेळगावसह सीमाभागात तीव्र पडसाद उमटले होते. येथील मराठी बांधव या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. अशातच बसवराज बोम्मई यांच्या यांच्या वक्तव्यामुळे आगीत आणखीनच तेल ओतले गेले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, ही क्षुल्लक गोष्ट असल्याचे बोम्मई यांनी म्हटले. त्यामुळे शिवप्रेमी बसवराज बोम्मई यांच्यावर चांगलेच संतापले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये निदर्शनेही सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसने अंबरनाथमधील शिवाजी चौकात निषेध व्यक्त केला. तसेच अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे. कर्नाटक सरकारला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.
शिवप्रेमींचा उद्रेक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खटकला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सीमाभाग आणि महाराष्ट्रात उमटले होते. बेळगावात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला तर महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे येथे कनार्टकातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले. शिवप्रेमींचा हा उद्रेक कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना खटकला असून कन्नड नागरिकांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही त्यासाठी आवश्यकती पावले उचलू असे म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून