हायलाइट्स:

  • कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली
  • कर्नाटकात भाजप सरकार आहे. पण दोषींवर कारवाई झाली नाही
  • यावर चंपा असो वा डंपा कोणीच बोलायला तयार नाही, असे वक्तव्य अरविंद सावंत यांनी केले.

मुंबई: बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी शिवसेनेकडून मुंबईतील अनेक भागांमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. कर्नाटकात भाजप सरकार आहे. पण दोषींवर कारवाई झाली नाही. मात्र, यावर चंपा असो वा डंपा कोणीच बोलायला तयार नाही, असे वक्तव्य अरविंद सावंत यांनी केले.
शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्मसमभावाची नव्हे: चंद्रकांत पाटील
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्यासपीठावर फक्त शोभेसाठी ठेवत नाही. शिवाजी महाराज हा आमचा जाज्वल्य अभिमान आहे. भाजपमधील कर्नाटक सरकारने त्यांचा अपमान केल्यावर उभ्या महाराष्ट्राला तिडीक आलीच पाहिजे. आम्ही कधी कन्नडिगांना त्रास दिला नाही. मात्र, असे प्रकार घडणार असतील तर १९६९ सालचं आंदोलन आठवा. भाजप शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर फक्त निवडणुकीसाठी करते. कर्नाटकात भाजप सरकार पण देशाच्या देवांचा अपमान होतो आणि कोणतीच कारवाई होत नाही. या घटनेवर चंपा असो वा डंपा कोणीच बोलत नाही. बंगळुरुतील प्रकारानंतर भाजपचे नेते अळीमिळी गुपचिळी, अशाप्रकारे वागत असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली.
Basavaraj Bommai: शिवप्रेमींचा उद्रेक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खटकला; म्हणाले, ‘कन्नडीगांचे रक्षण ही…’

‘…तर पंतप्रधानांच्या खुर्चीला धक्का लागेल’

बंगळुरुतील घटनेच्या निषेधार्थ मुंबईच्या लालबाग परिसरात निदर्शन करण्यात आले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. कर्नाटकमधील भाजप सरकार शिवरायांचा अपमान करत असेल, तर महाराष्ट्र ते खपवून घेणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिवाजी महाराजांविषयीचे विचार उच्चप्रतीचे आहेत. मग त्यांच्या पक्षाच्या सरकारचा मुख्यमंत्री असे विधान कसे करु शकतो. कर्नाटक ही महाराष्ट्राची बॉर्डर आहे. शिवसैनिक तिथे तुमचा इतिहास बिघडवल्याशिवाय राहणार नाहीत. अशा घटनांमुळे पंतप्रधानांच्या खुर्चीलाही धक्का बसू शकतो, असा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here