याठिकाणी काही विक्रेते थेट शेतातला कांदा असल्याची बतावणी करुन नागरिकांना सडके कांदे विकत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूरमध्ये नासके कांदे उन्हात वाळवून पुन्हा विकण्याचा प्रकार सुरू आहे.

कांदा कुजलेला

बदलापूरहून कर्जतकडे जाताना एमआयडीसी सीएनजी पंपाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. याठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कांदा पसरवून ठेवण्यात येतो.

हायलाइट्स:

  • बदलापूरहून कर्जतकडे जाताना एमआयडीसी सीएनजी पंपाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत हा धंदा राजरोसपणे सुरु आहे
  • रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कांदा पसरवून ठेवण्यात येतो
  • हा कांदा नासलेला आणि संपूर्ण ओला असतो

प्रदिप भणगे, बदलापूर: शहरी भागातील नागरिकांना थेट शेतातून आलेल्या भाज्या किंवा फळांविषयी अप्रूप असते. या भाज्या शेतात पिकवल्या आहेत, असे सांगितले की अनेकजण दोन जास्तीचे पैसे मोजून त्या विकत घेतात. याच गोष्टीचा फायदा घेत सध्या बदलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी काही विक्रेते थेट शेतातला कांदा (कांदा) असल्याची बतावणी करुन नागरिकांना सडके कांदे विकत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूरमध्ये नासके कांदे उन्हात वाळवून पुन्हा विकण्याचा प्रकार सुरू आहे. लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना पोलीस आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
Video: कांदा मिळाला नाही म्हणून तरुणीचा राडा; पाणीपुरी विक्रेत्याला केली मारहाण
बदलापूरहून कर्जतकडे जाताना एमआयडीसी सीएनजी पंपाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. याठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कांदा पसरवून ठेवण्यात येतो. हा कांदा नासलेला आणि संपूर्ण ओला असतो. तो उन्हात सुकला की तो सोलून पुन्हा विकण्यासाठी पाठवला जातो आहे. त्यामुळे बदलापूरकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

Aurangabad : हॉटेल चालकाने कांदा दिला नाही म्हणून दोन गटात तुफान हाणामारी

विशेष म्हणजे हा अवैध धंदा चालवणाऱ्याने याठिकाणी चक्क आठ माणसं कामाला ठेवली आहेत. बदलापूर शहरात थेट शेतातून कांदा विकण्यासाठी आणल्याचे सांगत अनेक टेम्पोचालक पाच-पाच किलोच्या गोण्या विकायला आणतात. बऱ्याचदा शहरात विकायला आणलेल्या कांद्याची विक्री न झाल्यामुळे तो नासतो. कधीकधी तो कांदा ओलाच असल्याने नागरिक विकत घेत नाहीत. त्यामुळे काही विक्रेत्यांकडून हा कांदा सुकवून पुन्हा पोत्यात भरून विकला जातो. त्यामुळे बदलापूरकरांनी असा कांदा खरेदी करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना पोलीस आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: महाराष्ट्रातील बदलापूर शहरातील बाजारात सडलेला कांदा विक्रीस
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here