मुंबई: अभिनेता सलमान खानचा जगभरात चाहतावर्ग आहे. सलमानच्या चित्रपटांची देखील प्रचंड चर्चा सुरू आहे. पण सध्या चर्चा आहे ती सलमानच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओची. सलमान मोठ्या पार्टी आणि लग्नसोहळ्यात हजेरी लावतो. नुकतीच त्याने माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली होती.
प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचा विवाहसोहळा नुकताच जयपूर इथं पार पडला. या सोहळ्याला नेतेमंडळी यांच्यासोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. या विवाहसोबळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सलमानचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सलमानचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. सलमानसोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अनिल कपूर यांनीही या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
सलमान झाला ट्रोल
सलमानचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. नेत्याच्या मुलाच्या लग्नात नाचल्यानं नेटकऱ्यांनी सलमानची खिल्ली उडवली आहे. पैशांसाठी असं लग्नात डान्स करणं तुला शोभत नाही, असं सलमानच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.