हायलाइट्स:

  • वडिलांच्या मृत्यूनंतर तेराव्या दिवशीच कुटुंबाला धक्का
  • मुलाने अपघातात प्राण गमावले
  • जळगाव जिल्ह्यातील घटनेनं हळहळ

जळगाव : वडिलांच्या मृत्यूनंतर तेराव्या दिवशीच मुलाने अपघातात प्राण गमावल्याची घटना समोर आली आहे. मित्राच्या दुचाकीवर बसल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच या दुचाकीस भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आणि अन्य तीन तरुण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता महामार्गावरील ट्रान्सपोर्टनगर जवळ हा अपघात झाला. रवी गणेश बोरसे (वय ३०, रा. रामेश्वर कॉलनी) असं मृत तरुणाचं नाव आहे. (जळगाव अपघात ताजे अपडेट)

रवी बोरसे या तरुणाचे वडील गणेश नामदेव बोरसे यांचे १३ दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. यामुळे घरावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. धार्मिक विधी आटोपल्यानंतर रविवारी रवी घराबाहेर पडला. कालिंका माता मंदिराजवळून त्याने योगेश पाटील या ओळखीच्या तरुणाकडे लिफ्ट मागितली. रवीला ट्रान्सपोर्टनगर परिसरातील गॅरेजवर जायचे होते. योगेशच्या दुचाकीवरुन येत असताना काही सेकंदातच मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच १८ बीजे ७४७७) दुचाकीस धडक दिली.

पुण्यात अमित शहांची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका; शिवसेनेबद्दल म्हणाले…

या अपघातात रवी रस्त्यावर पडल्यामुळे त्याच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेले आणि तो जागीच ठार झाला, तर योगश बाजूला पडल्यामुळे किरकोळ जखमी झाला. दरम्यान, या ट्रकने आणखी एका दुचाकीस धडक दिली. या दुचाकीवरील दोन तरुण देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवीचा मृतदेह पाहून परिसरातील नागरिकांनी त्याची ओळख पटवली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. मित्र, नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली होती. अविवाहित असलेल्या रवीच्या पश्चात आई सुमन तसेंच अक्षय, मनोज व पियुष हे तीन लहान भाऊ असा परिवार आहे.

शिवाजी महाराजांचा अपमान झाला तर भाजप शांत, यांची कबर खोदण्याची वेळ आलीय : अमोल मिटकरी

दरम्यान, या अपघातानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुधीर साळवे व मुदस्सर काझी हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रवीचा मृतदेह रुग्णालयात पोहोचवला. तसंच ट्रकचालक नवनाथ श्रीपत शिंदे (वय ३४, रा. मालेगाव, जळगाव लिंबायती) याला ताब्यात घेतलं आहे. चालक शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here