हायलाइट्स:

  • नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या
  • रोहित आर.आर. पाटील यांची तुफान फटकेबाजी
  • विरोधकांना दिलं खुलं आव्हान

सांगली : कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. राष्ट्रवादीच्या प्रचार सांगता सभेत रोहित आर.आर. पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. या भाषणात रोहित पाटील (राष्ट्रवादी रोहित पाटील) यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

‘निवडणुकीचा निकाल १९ तारखेला स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आता ज्यांच्या हाती १५ वर्षे सत्ता होती, नगरपंचायत होती आज तेच लोक आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी एकत्र आलो आहे, असं म्हणत आहेत. मी कवठेमहांकाळचा परिसर संपूर्ण पिंजून काढला आहे. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे हे मला माहीत आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, जे लोक मला सल्ले देण्याचे काम करत आहेत त्यांनी या शहरात काय विकास कामे प्रलंबित आहेत, हे माझ्या पुढे येऊन सांगावं,’ असं आव्हान रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सांगता समारंभ प्रसंगी बोलताना दिले.

कर्नाटकातील मंत्री आणि खासदारांनाही शिवप्रेमींच्या रोषाचा तडाखा!

नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या शिवाजी चौकात आयोजित केलेल्या प्रचार सांगता सभेत रोहित पाटील यांनी विरोधकावर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

‘मला बालीश म्हणून ठरवायचं व माझ्यावरच विरोधकांनी बोलायचं, ही वेळ कवठेमहांकाळ शहरात नेत्यांवर आली आहे. माझ्या वडिलांची आठवण काढल्याशिवाय विरोधकांना झोप लागणार नाही. निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनेल अनपेक्षित आहे. तसंच निकालसुद्धा अनपेक्षित लागणार आहे,’ असा विश्वासही यावेळी रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here