औरंगाबाद : वाढदिवसाचा केक तलवारीने कापण्याचा क्रेज एका भाईला आणि त्याच्या मित्रांना चांगलाच महागात पडला आहे. औरंगाबादच्या वैजापूर शहरात एका तरुणाचा वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापण्यात आला होता. जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदी असतांना सुद्धा तलवारिचा सार्वजनिक ठिकाणी वापर केल्याने आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ महाराष्ट्र टाईम्सने समोर आणला होता.
पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, १७ डिसेंबर रोजी ११ वाजता वैजापूर शहरातील शनीमंदिरसमोर काही तरुणांनी विनापरवाना बेकायदेशीर रित्या धारदार शस्त्र (तलवार ) हातात घेऊन केक कापून लोकांना एकत्र बोलावून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याच तक्रारीत म्हंटले आहे. तर हातात तलवार घेऊन केक कापण्याचा व्हिडीओ सुद्धा समोर आला होता. त्यांनतर ही कारवाई करण्यात आली असून, वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मी ३२व्या क्रमांकाची मंत्री नव्हते’, पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर टीका जिल्ह्यात शस्त्रबंदी लागू….
विशेष म्हणजे जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 11 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत जमावबंदी आणि शस्त्र बंदी कायदा लागू आहे. त्यामुळे या काळात पाच पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी जमा होता येत नाही. तसेच कोणतेही शस्त्र वापरता येत नाही. असं असताना तरुणांनी समोर ७-८ केक ठेवून तलवारीने कापले.