औरंगाबाद : दारूसाठी एखांदा व्यक्ती कोणत्या थरला जाईल याचा अंदाजच बांधता येत नाही. अशीच काही घटना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या परिसरात पाहायला मिळाली. दारुड्या मुलाला दारूची आठवण आली आणि तो वडिलांचा मृतदेह सोडून सोबत डेथसर्टिफिकेट घेऊन निघून गेला. डेथसर्टिफिकेट नसल्याने इतर नातेवाईकांना मृतदेह मिळेना, त्यामुळे अखेर बहिणींना भावाच्या शोधासाठी बाहेर पडावं लागलं.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी घाटी परिसरात ही घटना घडली. बाळासाहेब धोंडीराम सोनवणे (६० ) असे मृताचे नाव आहे. मृताच्या पत्नीने दिलेली माहिती अशी की, सोनवणे यांना फुफुसाचे आजार असल्याने घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. ही बाब कळताच मृताच्या दारुड्या मुलाने डॉक्टरांकडून ‘डेथ सर्टिफिकेट’ घेऊन निघून गेला. बराचवेळ त्याचा शोध घेतला, त्याला कॉल केले. मात्र, तो मिळून आला नाही.

पोलिसांकडून लिहून आणा नंतर मृतदेह देतो अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली. वयोवृद्ध पत्नी आणि मुलगी पोलीस चौकीत आले. मात्र पोलिसांनी असमर्थता दर्शवत त्या वृद्ध आजीला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखेर बहिणीला भावाच्या शोधासाठी बाहेर पडावं लागलं, पण काहीच फायदा झाला नाही. हे दृश्य पाहून सर्वच भावनिक झाले होते. बराचवेळ उलटल्यानंतर मुलगा आल्यानंतर मृतदेह डॉक्टरांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

‘मी ३२व्या क्रमांकाची मंत्री नव्हते’, पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर टीका
अनेकांनी संताप व्यक्त केला

दारुडा मुलगा डेथसर्टिफिकेट घेऊन निघून गेल्याने वृद्ध महिलेला मृतदेह मिळत नसल्याची माहिती उपस्थित असल्याने लोकांना कळल्याने अनेकांनी आपल्या-आपल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी तर घाटी बाहेर मुलाची शोधाशोध सुद्धा केली. पण मुलगा सापडत नसल्याने आणि हतबल झालेल्या वृद्ध महिला आणि मुलीला पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here