हवामान अंदाज विदर्भ अमरावती: Weather Alert : मराठवाडा-विदर्भ गारठला; ‘या’ जिल्ह्यात तापमानात मोठी घट, भरदिवसा शेकोटीचा आसरा – marathwada vidarbha weather news temperature drop in parbhani
परभणी : परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढला आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात ढगाळ वातावरणमुळे थंडी काहीशी गायब झाली होती. मात्र, मागील चार दिवसापासून तापमानात मोठी घट होत असल्याने गारठा वाढला आहे.
आज परभणीत ९.५ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. रब्बी पिकांमध्ये प्रामुख्याने हरभरा, गहू आणि तूर या पिकांना या थंडीचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे वाढलेल्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये कमालीची घट दिसून येत आहे. अनेक ठिकांनी शेकोट्या पेटलेल्या आहे . एकूणच या गुलाबी थंडीचा आनंद परभणीकर घेत आहे. दारुडा मुलगा दारुसाठी बापाचा मृतदेह रुग्णालयात सोडून गेला, जाताना सोबत नेलं… पुढील काही दिवस असाच गारठा कायम राहण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठच्या हवामान खात्याने वर्तवला आहे . त्यामुळे येणारे काही दिवस परभणीकरांना या बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागणार हे मात्र निश्चित.
विदर्भात उष्ण शहर गारठलं…
विदर्भ हा सर्वाधिक तापमानाचा प्रदेश आहे. नागपूर आणि चंद्रपूरात सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. उन्हाळ्यात चंद्रपूरचे तापमान सरासरी ४५ डिग्री असते. तर आता ४९ डिग्री तापमानाची नोंद चंद्रपूरात झालेली आहे. सर्वाधिक तापमान झेलणाऱ्या जिल्ह्यातील जनता आता मात्र गुलाबी थंडीने गारठली आहे. मागील काही दिवसांपासून तापमान घसरल्याने थंडीचा जोर वाढला आहे. भरदिवसा शेकोटीचा आसरा नागरिकांना घ्यावा लागत आहे.