vegetables rate today in mumbai: भाजीपाल्यांचे दर दुपट्टीने वाढले, पाहा काय आहेत मार्केटमध्ये नवीन भाव? – vegetables rate today good day to vegetables double the price
हिंगोली : वातावरणात होणाऱ्या सतत बदलाचा फटका भाजीपाला पिकाला मोठ्या प्रमाणावर बसल्यामुळे सध्या भाजीपाल्यांच्या दरात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र हिंगोली जिल्ह्यात बघायला मिळतं. त्यामुळे ज्यांच्या शेतात भाजीपाला टिकून आहे अशा शेतकऱ्यांना मात्र काही प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.
राज्यात ज्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आता हळूहळू नेहमीच्या आहारामध्ये असलेल्या भाजीपाल्याच्या दरांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यामध्ये वांगे १०० शंभरी पार, टॉमॅटो ८०, कोबी ६०, बीट ८०, मिरची ६०, मेथी जुडी आणि चळवली ७० रु. प्रति किलोचे दर अशा किरकोळ बाजारामध्ये बघायला मिळतात. सध्या हे दर वाढण्यामागचे एकमेव कारण म्हणजे वातावरणात होणाऱ्या बदलामुळे, पिकांप्रमाणेच भाजीपाला पिकांना देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची काटेकोरपणे निगा राखली, संगोपन केले अश्याच शेतकऱ्यांच्या यामध्ये सध्या भाजीपाला पीक बघायला मिळते. भाजीपाला जगविण्यासाठी फवारणी खर्च, मजुरी, ई खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागत आहे.
‘फक्त ५० कोटी द्या, मी घरदार सगळं तुमच्या नावावर करून जिल्हा सोडतो’ जिल्ह्यात भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शेतात उत्पादन कमी निघत असल्याने बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर सध्या लग्नसराई सुरू असताना वांग यासह इतरही भाजीपाल्या त्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. जर वातावरणातील बदल प्रकारे घडून येत राहिले तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता जाणकार मंडळींकडून ऐकायला मिळतं.