औरंगाबाद : भारतासह जगभराची चिंता वाढवणाऱ्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे महाराष्ट्राची सुध्दा चिंता वाढली आहे. त्यातच आता औरंगाबादचा व्यक्ती मुंबईत ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र, या रुग्णाला मुंबईतच क्वारंटाइन करण्यात आल्याने चिंता करण्याची गरज नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर लसीकरण मोहीमेच्या वेग सुद्धा मंदावला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.