हायलाइट्स:

  • प्रसादासाठी आणलेल्या हलव्यातून २० ग्रामस्थांना विषबाधा
  • पनवेल तालुक्यातील रिटघर येथील घटना
  • खोपोलीतील स्वीट शॉपमधून आणली होती मिठाई
  • पोलिसांनी स्वीट शॉप मालकाविरोधात दाखल केला गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

दत्तजयंतीच्या प्रसादासाठी आणलेला दुधी हलवा खाल्ल्याने २० जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी पनवेल तालुक्यातील रिटघर गावात घडली. विषबाधा झालेल्या ग्रामस्थांची प्रकृती स्थिर आहे. पीडितांपैकी १० महिन्यांचे बाळ वगळता सर्वांनी घरी राहूनच डॉक्टरांकडून उपचार घेतले. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात खोपोलीतील मिठाई दुकानमालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रिटघर गावातील दत्तमंदिरात दरवर्षी दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्वजण एकत्र येऊन जेवण करतात. आयोजकांनी आणलेला दुधी हलवा सर्व ग्रामस्थांना दिला. दुपारचे जेवण केल्यानंतर काही वेळाने काही जणांना जुलाब आणि उलट्या होऊ लागल्यामुळे एकमेकांना विचारणा करण्यात आली. सर्वांनाच त्रास होत असल्याचे लक्षात आले. खाण्यात काहीतरी आल्यामुळे विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर दुधीभोपळ्यातून हा प्रकार घडल्याचे लक्षात आले.

‘ती’ प्लॅटफॉर्मवरूनच प्रवाशाचा पाठलाग करत होती, गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये चढली अन्…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; मुंबईतील एकाचा मृत्यू, दाट धुक्यामुळे झाला अपघात

विषबाधा झालेल्यांमध्ये कायस भोपी (वय १ वर्ष ३ महिने), निधी भोपी (५), विनोद भोपी (३८), स्वरा पाटील (५) स्वराली पाटील (३), प्रिन्स पाटील (३), बेबी पाटील (४५), उषा भगत (४०), तन्वी भोपी (२०), जयवंत भोपी (३५), पंडित भोपी ( ७०) भावना भोपी (३५), नेत्रा भोपी (६०), शंकर कडू (५५), बेबी भोपी (५०), जिजाबाई भोपी (५५), गंगाबाई भोपी (४५), भूमिका भोपी (१५), दक्ष भोपी (१०) आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे विषबाधा झालेल्यांमध्ये १० महिन्यांचा जियांश भोपी या बालकाचाही समावेश आहे. मात्र सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. जियांशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इतरांनी घरातूनच उपचार घेतले. या प्रकरणी खोपोलीतील बिकानेर स्वीटमार्ट दुकानचालकावर पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुधी हलवा शुक्रवारी रात्री खोपोलीतून आणल्यानंतर फ्रिजमध्ये न ठेवता उघडा ठेवण्यात आला, या निष्काळजीमुळेच ग्रामस्थांना विषबाधा झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक चौकशीत व्यक्त केला.

aishwarya rai – jaya bachchan ऐश्वर्या रायची ईडीकडून कसून चौकशी; जया बच्चन यांनी संसदेत दिला ‘शाप’
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, पुण्याच्या वढु बुद्रुकमध्ये संभाजी महाराजांच्या स्मारकाला मंजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here