हायलाइट्स:

  • ओमिक्रॉनचं सावट असताना, महाराष्ट्राला मोठा दिलासा
  • राज्यात आज, सोमवारी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही
  • राज्यात आज दिवसभरात ५४४ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद
  • एकूण ५१५ करोनाबाधित रुग्ण बरे, रुग्णालयांतून डिस्चार्ज

मुंबई: राज्यात ओमिक्रॉनबाधित (ओमिक्रॉन) रुग्ण सापडत असतानाच, आज, मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आज, सोमवारी एकही ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळलेला नाही. आतापर्यंत राज्यातील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ५४ आहे.

राज्यावर ओमिक्रॉनचं सावट असतानाच, आज मोठा दिलासा देणारी आकडेवारी आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे ओमिक्रॉनबाधितांची संख्या आतापर्यंत ५४ इतकी आहे.

Omicron In India: देशातील ओमिक्रॉन स्थितीबाबत महत्त्वाचा तपशील; महाराष्ट्राला मोठा दिलासा
चिंता वाढली! ऑक्सीजन बेड, ICU बेड, सज्ज ठेवा; औरंगाबाद जिल्हाधिकार्‍यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना

राज्यात आज ४ करोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही. तर आज एकूण ५१५ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९८,०१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७. ७१ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५४४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज चार करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७७,७१,६७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५०,१४० (९.८१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८१,६६१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ८७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ओमिक्रॉनबाधित रुग्ण किती आणि कुठे?

राज्यातील ओमिक्रॉनची बाधा झालेल्या ५४ रुग्णांपैकी सर्वात जास्त २२ रुग्ण मुंबईत आहेत, तर पिंपर- चिंचवडमध्ये ११, पुणे ग्रामीणमध्ये ७, पुणे महापालिका क्षेत्रात ३ , साताऱ्यात ३, कल्याण डोंबिवलीत २, उस्मानाबादमध्ये २, बुलडाणा, नागपूर, लातूर आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या ५४ रुग्णांपैकी एकूण २८ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

omicron latest update: चिंता वाढवणारी बातमी; राज्यात आज ओमिक्रॉनचे ६ नवे रुग्ण, यांपैकी मुंबईत चौघांचे निदान
नाताळ, नववर्ष पार्ट्यांवर अधिक करडी नजर; ४८ पथके तैनात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here