हायलाइट्स:

  • मुंबईतील धक्कादायक घटना
  • चेंबूरच्या वाशीनाका परिसरात प्राणघातक हल्ला
  • एका युवकावर गोळीबार, दुचाकीवरून हल्लेखोर पसार
  • प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला घटनेचा थरार

मुंबई: मुंबईतील चेंबूर येथील वाशीनाका येथील न्यू आरएनए म्हाडा कॉलनीमध्ये एका युवकावर दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. ही घटना घडली त्यावेळी एक महिला तिथेच होती. तिने या घटनेचा थरार सांगितला.

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील न्यू आरएनए म्हाडा कॉलनीत हा धक्कादायक प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या दोन तरूणांनी एकावर गोळीबार केला. तरूणावर या युवकावर तलवारीनेही वार केला. युवकाने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडक्यात बचावला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, आरसीएफ पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे.

Thane : मुंब्रा येथे ड्रग्जविरोधी धडक कारवाई; ड्रग्ज कुठून आणले, कुठे विक्री करणार होते?
‘ती’ प्लॅटफॉर्मवरूनच प्रवाशाचा पाठलाग करत होती, गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये चढली अन्…

वाशीनाका येथे राहणारा रवींद्र गायकवाड उर्फ पिंट्या याच्यावर आज सायंकाळी हा हल्ला झाला. दोन अज्ञात व्यक्तींकडून हा जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला कोणी केला आणि कारण काय हे कळू शकलेले नाही. या हल्ल्यात जखमी झालेल्या गायकवाड याने सांगितले की, माझ्या आवारात उभा असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींपैकी एकाने बंदूक रोखली; मात्र गोळीबार केल्यानंतर ती चुकवली. पिस्तुलातून झाडलेली गोळी समोरील भिंतीला लागली, त्यानंतर दुसरी गोळी झाडली, तीही चुकवली. यात सुदैवाने वाचलो. त्यातच दुसऱ्याने तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो मी चुकवत असताना माझ्या खांद्याला तलवारीचा घाव लागला. मी मोठा दगड उचलून त्यांच्यावर भिरकावल्यावर ते दुचाकीवरून पसार झाले. घटनास्थळी असलेल्या एका महिलेने ही घटना आपल्या समोर घडल्याचे पोलिसांना सांगितले. आता या प्रकरणी पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी संजय दराडे, कृष्णकांत उपाध्याय, बाळासाहेब आवटे यांनी भेट दिली. घटनेची पाहणी करून तपास सुरू केला आहे.

a youth carrying a pistol: एक तरुण पिस्तूल घेऊन येणार आहे; पोलिसांना माहिती मिळाली आणि…
धक्कादायक! चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या; नंतर पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here