परभणी : राज्यात सध्या आरक्षणावरुन मोठा वाद पेटला आहे. एकीकडे मराठा तर दुसरीकडे ओबीसी आणि मुस्लिम आरक्षणावरुनही राजकीय वातावरण तापलं आहे. अशात मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

माझे ३० ते ३५ आमदार निवडून द्या, अवघ्या १० मिनिटांत ओबीसींची गंमत करून दाखवतो. मराठ्यांना आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो, असं वक्तव्य रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. ते परभणीच्या गंगाखेड येथे ओबीसी एल्गार आंदोलनाला संबोधित करत होते.

Omicron News Update in Maharashtra : ओमिक्रॉनचं सावट असताना महाराष्ट्राला मोठा दिलासा! पाहा, आजची ताजी आकडेवारी

एवढ्यावरच न थांबता जाणकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना थेट ओबीसी म्हणून संबोधलं. या देशात मुस्लिमांवर तर किती अन्याय आहे. गॅरेज बघितले की मुस्लिम, अंड्याचे दुकान बघितले की मुस्लिम, कोंबडीचं दुकान बघितलं की मुस्लिम, कुठं कलेक्टर नाही. बोंबाबोंब आहे. राज्य चालवणारा तिसराच मालक असतो. म्हणून आपण ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे, असंही यावेळी जानकर म्हणाले.

दरम्यान, ते पुढे म्हणाले की, ‘मराठा समाजाला माझी विनंती आहे. शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण होतं. पण नंतर मराठ्यांचं आरक्षण का गेलं ? छत्रपती राजे शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. पण आमच्या तथाकथीत लोकांना वाटलं आमचं गावचं लई मोठं आहे. आम्हाला नको तसलं आरक्षण आणि आज काय अवस्था झाली आहे’, अशा शब्दात जानकर परभणी बोलत होते.
Raosaheb Danve : ‘सर्जा राजा’च्या साथीने रावसाहेब दानवेंची सपत्निक शिवारफेरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here