नागपूर: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने आता तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला. स्वस्त धान्य दुकानातून एकाच वेळी तीन महिन्यांच्या धान्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा अन्नधान्य पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

शिधा वाटप दुकानदारांकडून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांची चलने भरून घेण्यात येत आहेत. या चलनाच्या आधारावर तिप्पट अन्नधान्य वितरित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पीओएस मशीनवर देखील १ एप्रिलपासून एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे अन्नधान्य एकाचवेळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न धान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक शिधा वाटप यांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

अशी होणार वाहतूक

एकाच वेळी धान्याची उचल होणार असल्याने धान्य वाहतूकदारांना अधिक वाहनांची गरज भासेल. सध्याची परिस्थिती लक्षात घेता या वाहनांवर फलक लावण्यात येणार आहे. या फलकांवर महाराष्ट्र शासन, अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था असे लिहिलेले असणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here