SSC वेळापत्रक 2022 : उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर वेळापत्रक तयार केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. चार मार्च 2022 ते सात एप्रिल 2022 या दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. तर 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 यादरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच, ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. कोरोना महामारीमुळे 25 टक्केंचा अभ्यास याआधीच कपात करण्यात आला आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील, असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. अखेर आज दहावी-बारवी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

दहावी बारवी परीक्षेचा सविस्तर वेळापत्रक जाहीर

 • 15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
 • 16 मार्च: दुसरी किंवा तिसरी भाषा
 • 19 मार्च : इंग्रजी
 • 21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
 • 22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय  (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
 • 24 मार्च : गणित भाग – 1
 • २६ मार्च : गणित भाग २
 • 28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
 • 30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
 • 1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
 • 4 एप्रिल :  सामाजिक शास्त्र पेपर 2

प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी,दहावीसाठी अनुक्रमे 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 आणि 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 याकालावधीत पार पडेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.  दहावी,बारावीच्या आऊट ऑफ टर्न परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या (10वी) परीक्षांचा तपशील खालीलप्रमाणे…

15 मार्चला मराठी, 24 मार्चला गणित, दहावीच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर

कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच बाराचीचा निकाल जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि दहावीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे गायकवाड यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.

15 मार्चला मराठी, 24 मार्चला गणित, दहावीच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here