हायलाइट्स:
- तरूणाने पुलावरून समुद्रात मारली उडी
- स्थानिक मच्छिमारांनी होडीच्या साह्याने वाचवले प्राण
- स्थानिकांच्या सतर्कतेमुळे तरूणाला जीवदान
- तरूणाचे प्राण वाचवणाऱ्या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव
मिळालेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास भाट्ये पूल येथे ही घटना घडली. येथील एका तरूणाने पुलावरून समुद्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिक मच्छिमार तरूणांच्या सतर्कतेमुळे या तरूणाला वाचवण्यात यश आले आहे.
भाट्ये पुलावरून एका तरुणाने समुद्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. होडीच्या साह्याने काही मच्छिमार तरूणांनी त्याचा जीव वाचवला, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले. आफान रऊफ वस्ता, अरमान नजीर होडेकर, सलमान नजीर होडेकर अशी दक्ष मच्छिमार तरूणांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, एका तरूणाने दुपारी १२ वाजताच्या सुमारास राजीवडा-भाट्ये पुलावरून समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथील तरूणांनी ही घटना बघितली. त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. होडीच्या मदतीने तरूणांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणाला बाहेर काढले. दरम्यान, या पुलावरून अनेकांनी समुद्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. येथील स्थानिक मच्छिमारांनी अनेकांचे प्राणही वाचवले आहेत. मच्छिमारांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times